(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War : युक्रेनमधून किती भारतीय परतले मायदेशी? आकडा आला समोर
Ukraine Russia War : युक्रेनमधून आतापर्यंत 15 हजार 920 हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत.
Ukraine Russia War : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 76 विमानांमधून 15 हजार 920 हून अधिक नागरिकांना परत आणले आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्दोव्हा मार्गे भारत सरकार आपल्या नागरिकांना परत आणत आहे. 26 फेब्रुवारी रोजी पहिले विमान भारतीयांना घेऊन मायदेशी परतले होते. 26 फेब्रुपारीपासून आतापर्यंत 15 हजार 920 नागरिक मायदेशी परत आले आहेत.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने आपली हवाई हद्द नागरी विमानांसाठी बंद केली आहे. त्यामुळे युक्रेनशेजारील देशांमधून भारतीयांना पतर आणले जात आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 13 विमानांमधून अडीच हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. हंगेरी, रोमानिया आणि पोलंडमधून भारतीयांना परत आणण्यासाठी पुढील 24 तासांत सात उड्डाणे नियोजित आहेत. बुडापेस्ट येथून पाच, पोलंडमधील रेझो आणि रोमानियामधील सुसेवा येथून प्रत्येकी एक उड्डाण असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
"ऑपरेशन गंगा अंतर्गत, आतापर्यंत 76 विमानांमधून 15 हजार 920 हून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. 76 पैकी 13 विमाने गेल्या 24 तासात भारतात दाखल झाली आहेत.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील उत्तर-पश्चिम आणि ईशान्येकडील राजधानी कीव्हच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर रशियाच्या दुसर्या गटाने खार्किव या उत्तरेकडील शहरावर बॉम्बहल्ला केला आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बहल्ला आणि गोळीबार करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine Conflict : युक्रेनमधील ओडेसावर रशियाकडून हल्ला होऊ शकतो : झेलेन्स्कींचा दावा
- Ukraine Russia War : रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त; व्होदिमर झेलेन्स्कींचा दावा
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता