एक्स्प्लोर

Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!

Jal Jeevan Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ड्रीम योजना मानल्या गेलेल्या "जलजीवन मिशन" अंतर्गत वर्धा जिल्ह्यात असेच घडत आहे.

वर्धा : लाखो रुपयांच्या नळ योजनेतून फक्त काही दिवस पाणी मिळाल्यानंतर ती नळ योजना दीड वर्षांपासून बंद पडून असेल आणि त्याच्यातून पाण्याचा एक थेंबही गावकऱ्यांना मिळत नसेल, तर तुम्ही काय म्हणणार??? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ड्रीम योजना मानल्या गेलेल्या "जलजीवन मिशन" (Jal Jeevan Mission) अंतर्गत वर्धा (Wardha News) जिल्ह्यात असेच घडत आहे. 

ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने खास "जलजीवन मिशन" सुरू केले होते. केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये त्यामध्ये खर्च झाले. मात्र, तरी भ्रष्ट व्यवस्था आणि निकृष्ट कामामुळे राज्यात अनेक गाव आणि वस्त्या अशा आहेत, जिथे योजना राबवल्यानंतर अवघ्या काही दिवसात नळ कोरडे ठाक पडले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही वेड्यात पाणी पुरवठा योजनेत असेच काही घडत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत कोल्ही गावात तसेच जवळपासच्या बेड्यात (पारधी वस्ती) नळ योजना राबवण्यात आली. प्रत्येक घरासमोर एक नळ देण्यात आले. स्वच्छ पिण्याचे पाणी घरासमोरच मिळेल अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र, काही दिवस (1 महिन्यापेक्षा कमी कालावधी) नळातून पाणी मिळाले. मात्र गेले दीड वर्ष नळ योजना पूर्णपणे ठप्प पडली असून लाखो रुपये खर्च करून प्रत्येक घरासमोर उभारण्यात आलेल्या नळातून पाण्याचा थेंबही गावकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे काही दिवस झालेला पाणीपुरवठा विकासाची धुळफेक होती की काय असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 

दरम्यान एबीपी माझाने कोल्ही बेड्यातील ग्रामीण भागाची, वाड्या वस्त्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर हिंगणघाट तालुक्यातील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधले. त्यांनी कोल्ही वेड्यात पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा बसवण्यात आल्याचे मान्य केले. मात्र सध्या गेली दीड वर्ष ही योजना का बंद आहे याची चौकशी करू असे थातूरमातूर उत्तर दिले. दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत बंद पडलेली पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला दिले आहे.मात्र, गेले दीड वर्ष प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

"एकीकडे सरकार 'हर घर जल'च्या घोषणांनी नागरिकांना आश्वासने देत असतानाच, कोल्ही वेड्यातील ही परिस्थिती मात्र प्रशासकीय उदासिनतेचा कळस ठरत आहे. कागदावर पूर्ण दिसणारी ही योजना प्रत्यक्षात दीड वर्षांपासून भंगारात निघण्याच्या मार्गावर आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही जर गावकऱ्यांना पुन्हा मैलोन्मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल, तर या भ्रष्ट कारभाराची चौकशी होणार की अधिकारी केवळ 'चौकशी करू' अशा उत्तरांमागे हात झटकणार? हा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत. सरकारने केवळ पाईपलाईन टाकून आपले कर्तव्य संपले असे न समजता, त्यातून पाणी येईल याची शाश्वती देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget