एक्स्प्लोर

UGC Final Year Exam SC Hearing | परीक्षा रद्द करण्याचा अधिकार स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटला आहे का? : सुप्रीम कोर्ट

SC on UGC Final year Exam Dates | देशातील कोरोना परिस्थितीचा दाखल देत, यूजीसीच्या नव्या गाईडलाईन्सला आव्हान देण्यात आलं आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार यूजीसीने सर्व विद्यापीठांनी 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

नवी दिल्ली : देशभरातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टानं सर्व पक्षकारांना त्यांचे अजूनही काही मुद्दे असल्यास ते लिखित स्वरुपात द्यायला तीन दिवसांचा अवधी दिला आहे.  त्यानंतर निकालाची तारीख त्यानंतर जाहीर होणार आहे.

देशभरातील विविध विद्यापीठांमधील सुमारे 31 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन यूजीसीने 6 जुलै रोजी जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. यूजीसीने आपल्या सुधारित गाईडलाईन्समध्ये देशातील सर्व विद्यापीठांना सूचना केली आहे की, अंतिम वर्षांच्या परीक्षा 30 सप्टेंबरच्या आधी घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या याचिकेत मागणी केली आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन आधीच्या परीक्षांच्या मूल्यांकनानुसार निकाल द्यावा.

अरविंद दातार यांचा युक्तिवाद आणि न्यामूर्तींचे प्रश्न यूजीसी परीक्षेसाठी नियम सांगू शकते पण परीक्षा घेण्यासंदर्भात त्यांना सर्वाधिकार नाहीत, असं याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार यांनी घटनापीठाचा हवाला देत कोर्टाला सांगितलं.

त्यावर न्यायमूर्तींनी तो निर्णय मेडिकल कॉलेज संदर्भात होता असं सांगितलं. परंतु त्या निकालाचा संबंध या ठिकाणी मी दाखवू शकतो, असं दातार म्हणाले.

परीक्षा न घेण्याचा निर्णय डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत येतो का हा सुद्धा इथे प्रश्न आहे, असं. न्यायमूर्ती अशोक भूषण म्हणाले तर यामुळे परीक्षांचा दर्जा सुद्धा खालावणार नाही का, असा प्रश्न न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांनी विचारला

त्यावर दातार यांनी आयआयटीचे उदाहरण दिलं. या विषयात आयआयटीचा संबंध नाही, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. मी एवढेच सांगू इच्छितो की जर एखादी केंद्रीय, प्रतिष्ठित संस्था हे करु शकते तर हे का करु शकत नाही, असं दातार म्हणाले.

अरविंद दातार काय म्हणाले? परीक्षा घेण्यात ज्या व्यावहारिक अडचणी आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी अनेक बाहेरगावचे विद्यार्थी शिकतात, ते त्यांच्या गावी परत गेले आहेत. अनेक शिक्षण संस्था टेस्टिंग, क्वारंन्टाईन सेंटर म्हणून वापरल्या जात आहेत. यूजीसी म्हणते राज्यांनी स्थितीचा आढावा घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्यात. जेव्हा देशात 15 हजार केसेस होत्या, तेव्हा आपण परीक्षा घेऊ शकलो नाही. मग आता कशा बरं घेऊ शकतो? यूजीसीच्या गाईडलाईन्स देशात महामारीची स्थिती, अडचणी लक्षात न घेता सर्वत्र एकच नियम लावत आहे. हे घटनेच्या कलम 14 चं उल्लंघन आहे, असमान स्थितीला समान गृहीत धरुन ते सर्वांवर निर्णय थोपवत आहे.

ओदिशा सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात यूजीसीच्या प्रकरणात ओडिशा सरकारचे महाधिवक्ता आणि पश्चिम बंगालमधल्या शिक्षक संघटनांचे वकील यांनीही यूजीसीच्या विरोधात बाजू मांडली आहे. परीक्षा घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तर यूजीसीला अनुदान रोखण्याचा अधिकार : अलख श्रीवास्तव यूजीसीच्या गाईडलाईन्स पाळल्या नाहीत तर अनुदान रोखण्याचा अधिकार यूजीसीला प्राप्त आहे, असं वकील अलख श्रीवास्तव यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं. यूजीसीच्या बाजूने अलख श्रीवास्तव हे बाजू मांडत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडलेMaharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special ReportSaurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Embed widget