एक्स्प्लोर
'नीट'वर आता वयाचं बंधन, यूजीसीचा निर्णय
नवी दिल्ली : नीट या मेडिकल प्रवेश पात्रता परीक्षेवर आता मोठी बंधनं घालण्यात आली आहेत. आता केवळ 25 वर्षे वयापर्यंत आणि तीनच वेळा नीटची परीक्षा देता येणार येईल, असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने घेतला आहे.
वर्षानुवर्षे प्रयत्न करुन मेडिकलला प्रवेश मिळवणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी यूजीसीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. किमान 17 वर्षे आणि जास्तीत 25 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना यापुढे ही परीक्षा देता येणार आहे.
आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 30 ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आत्तापर्यंत नीटसाठी वयाचं आणि कितीही वेळा परीक्षा देण्याचं कोणतंही बंधन नव्हतं. मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट म्हणजे राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement