एक्स्प्लोर
गप बस नाहीतर रेप करेन, उबर चालकाची तरुणीला धमकी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये उबर कॅबने प्रवास करणाऱ्या तरुणीने चालकाने आपल्याला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. गाडीचा मार्ग वळवल्यामुळे आपण आरडाओरड केल्यानंतर ही धमकी दिल्याचा दावा तरुणीने केला आहे.
पश्चिम बंगालमधील सॉल्टलेक परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. तरुणीचा मित्र अरण्यभवन परिसरात उतरल्यानंतर उबर चालकाने गाडीचा मार्ग वळवला. त्यावेळी आरडाओरडा करुन तिने गाडी थांबवण्यास सांगितलं असता, ड्रायव्हरने स्पीड वाढवला. तेव्हा 'गप बस नाहीतर रेप करेन' अशी धमकी चालकाने दिल्याचं तिनं सांगितलं.
तरुणीने धावत्या गाडीतून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला. मात्र त्यानंतरही चालकाने कारखाली चिरडून तिचा जीव घेण्याची धमकी दिली. मात्र कसंबसं फुटपाथवर उडी मारुन तिने सुटका करुन घेतली.
28 वर्षीय चालक शंटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर छेडछाड आणि धमकावण्याचा आरोप आहे. शंटूला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement