Parag Agrawal Twitter CEO: धोनीच्या षटकारानंतर धिंगाणा, वर्ल्डकप विजयानंतर रस्त्यावर येऊन जल्लोष; ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचं क्रिकेटप्रेम
Parag Agrawal Twitter CEO: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
Parag Agrawal Twitter CEO: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय. यानंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. दरम्यान, पराग अग्रवाल यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत.
ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारणाऱ्या पराग अग्रवाल यांचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. या व्हायरल फोटोतून त्यांचं क्रिकेटप्रेम पाहायला मिळत आहे. भारतानं एकदिवसीय विश्वचषक 2021 जिंकल्यानंतर पराग अग्रवाल विजय साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पराग मित्रांसोबत दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात तिरंगा आहे.
भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेच्या पराभव केला होता. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला. त्यांनी 1983 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकलं होतं. भारतानं विश्वचषक जिंकल्यावर संपूर्ण देश जल्लोषात मग्न झाला होता. लोक रस्त्यावर उतरले. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होतं.
अग्रवाल 2011 मध्ये ट्विटवर रुजू
अग्रवाल यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केली. त्यानंतर ते 2005 मध्ये यूएसला गेले आणि संगणक सायन्समध्ये डॉक्टरेट करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात दाखल झाले. तिथं डेटाबेसवर केंद्रित असलेल्या संशोधन गटात ते सामील झाले. 2011 मध्ये पीएचडी पूर्ण करण्यापूर्वी ते ट्विटरमध्ये जॉईन झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचं ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून प्रमोशन झालं. आता ते ट्विटरचा सीईओ बनले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
हे देखील वाचा-