एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वय-अनुभवाचा मान, त्रिपुरा भाजप अध्यक्ष माणिक सरकारांच्या पाया पडले!
त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील आघाडीचे बिपलाब देब यांनी मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
आगरताळा (त्रिपुरा): सध्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हरवत चालल्याचं सगळीकडे पाहायला मिळतं. निवडणुकीच्या काळात तर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका ऐकायला मिळते. मात्र नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या त्रिपुरामध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं.
त्रिपुराचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील आघाडीचे विप्लव कुमार देब यांनी मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
बिप्लब कुमार देब
वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले माकप नेते माणिक सरकार यांनी, तब्बल 20 वर्षे त्रिपुराचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. त्यामुळेच वयाचा आणि अनुभवाचा मान राखत, कट्टर विरोधक असलेल्या विप्लव देब यांनी कटुता बाजूला सारत आशिर्वाद घेतले.
यावेळी 69 वर्षीय माणिक सरकार यांनीही 48 वर्षीय बिप्लब यांना शुभेच्छांसह आशीर्वाद दिला.
आजच्या या चित्रामुळे त्रिपुरात तरी निकोप लोकशाही पाहायला मिळाली.
त्रिपुरात भाजपचा विजय
त्रिपुरात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने माकपची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. भाजपने 60 पैकी 35, आयपीएफटी 8 आणि माकपला केवळ 16 जागा मिळाल्या. भाजप आणि आयपीएफटीची युती असल्याने त्यांच्या जागा तब्बल 43 झाल्या.
गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही.
त्रिपुरा हा डाव्यांचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत भाजपला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र यंदा भाजपने थेट सत्ता स्थापन केली आहे.
संबंधित बातम्या
ईशान्य भारतात मोदी लाट, त्रिपुरात भाजप, मेघालयमध्ये त्रिशंकू
‘लेफ्ट’ भारतासाठी ‘राईट’ नाहीत : अमित शाह
ईशान्येकडील विजय बलिदान देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित : मोदी
काँग्रेसला धक्का, मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement