Farmers Protest | चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता; शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या व्यक्तीचा दावा
केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 59वा दिवस आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 59वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच 26 जानेवारी म्हणजेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होतं असल्यांचं सांगितलं जात आहे. मोठी गोष्ट ही आहे की, शेतकरी युनियनने दावा केला आहे की, ट्रॅक्टर परेड दरम्यान, चार शेतकरी नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचला जात आहे.
शेतकऱ्यांच्या वतीनं माध्यमांसमोर आणलेल्या व्यक्तीचे दावे?
आज सिंघु बॉर्डरवर शेतकरी संघटनांच्या वतीनं एका व्यक्तीला माध्यमांसमोर सादर करण्यात आलं. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान, हिंसा आणि चार नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचण्यात आला होता. व्यक्तीने सांगितलं की, "आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे." ही व्यक्ती पुढे बोलताना म्हणाली की, "रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचं काम करतील."
#WATCH | Delhi: Farmers at Singhu border present a person who alleges a plot to shoot four farmer leaders and cause disruption; says there were plans to cause disruption during farmers' tractor march on Jan 26. pic.twitter.com/FJzikKw2Va
— ANI (@ANI) January 22, 2021
त्या व्यक्तीनं प्रदीप नावाच्या एका एचएचओचं नावही घेतलं
व्यक्तीनं हेदेखील सांगितलं की, ट्रॅक्टर परेड दरम्यान स्टेजवर असणाऱ्या चार शेतकरी नेत्यांना गोळी मारण्याची ऑर्डर होती. या नेत्यांचे फोटोही देण्यात आले आहेत." सर्वा मोठी गोष्ट म्हणजे, या व्यक्तीनं प्रदीप नावाच्या एता एसएचओचं नावंही घेतलं आहे, जो राई स्थानकातील असून इतर साथीदारांना भेटण्यासाठी आपला चेहरा कव्हर करुन येत असते. त्या व्यक्तीनं सांगितलं की, ज्या चार शेतकरी नेत्यांना गोळी मारण्यास सांगण्यात आलं आहे, त्यांची नावं मला माहिती नाही." शेतकऱ्यांनी या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
दिल्लीतील आउटिंग रोडवर होणार ट्रॅक्टर परेड : शेतकरी
दरम्यान, ट्रॅक्टर परेड काढण्याबाबत शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. शेतकऱ्यांच्या वतीनं ट्रॅक्टर परेडसंदर्भात दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या बैठकीबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, "पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या वतीनं एका रोपमॅप शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. ज्यावर आम्ही विचार करुन रविवारी आमचा निर्णय कळवणार आहोत."
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वतीनं शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर ट्रॅक्टर परेड काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु, शेतकरी संघटनांद्वारे हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, हा ट्रॅक्टर मार्च दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर असणार आहे. ट्रॅक्टर परेडसाठी देशभरातून लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम
नवी दिल्लीत 11 व्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली आहे. बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. बैठकीत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, "11 व्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ते म्हणाले की सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे." नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, "मी हे कठोर अंतःकरणाने सांगतोय की शेतकर्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवी आहे. तुमच्या सहकार्याबद्दल सरकार कृतज्ञ आहे. कायद्यात कोणतीही कमतरता नाही. आम्ही तुमच्या सन्मानार्थ एक प्रस्ताव ठेवला आहे. आपण निर्णय घेऊ शकला नाहीत. आपण एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचल्यास माहिती द्या. यावर पुन्हा चर्चा करू" तर बैठकीनंतर शेतकरी नेते म्हणाले की, "आम्ही कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत, आंदोलन कायम राहील. वाटाघाटीची पुढील तारीख निश्चित केलेली नाही."