ABP Majha Morning Headlines : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान चाळीशी पार गेल्यानं काळजी घेण्याचं आवाहन
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. वाचा सविस्तर
काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर, माजी मुख्यमंत्री शेट्टर हुबळी-धारवाड मध्यमधून रिंगणात
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाकमधील (Karnataka Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असाच सामना होत आहे. दरम्यान, काँग्रेसने निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर ( (Jagadish Shettar) यांचाही समावेश आहे. त्यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. वाचा सविस्तर
कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, आयएनएक्स मीडिया मनीलाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई
आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने (ED) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांची 11 लाख 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यातील ही स्थावर मालमत्ता आहे. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
समलिंगी विवाहावरुन सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारमध्ये रंगला सामना
समलैंगिक विवाहाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) आज सुनावणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने या मागणीस कोर्टात कडाडून विरोध केला आहे. समलैंगिक विवाहांना मान्यता देणं सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत नाही, असा केंद्रने सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला आहे. पुरुष आणि स्त्रीपणाची व्याख्या केवळ साचेबद्ध पद्धतीने ठरवता येणार नाही. बायोलॉजिकल संकल्पनेच्या पलीकडे हा काही किचकट मुद्दा असल्याचे सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. वाचा सविस्तर
Rahul Gandhi पोहचले बंगाली मार्केटमध्ये,चटपटीत पाणीपुरी शरबत-ए-मोहब्बतचा घेतला आस्वाद
राहुल गांधींनी बंगाली मार्केटमध्ये चटपटीत पाणीपुरीचा आस्वाद घेतला . राहुल गांधी मार्केटमध्ये पोहचताच अनेकजण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. वाचा सविस्तर
नाफेडकडून मोहरीची खरेदी सुरु, हरियाणासह राजस्थान आघाडीवर; खुल्या बाजारापेक्षा MSP अधिक
सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची (Wheat) मोठ्या प्रमामात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने (Nafed) 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा (Haryana) पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
सिंह, तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. आजचा दिवस सिंह, तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या राशींच्या लोकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य
पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित, मुकेश अंबानी यांचा जन्म, स्वातंत्र्यसैनिक अहिल्याताई रांगणेकर यांचे निधन
प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आज 19 एप्रिल रोजीदेखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन यांचा आज स्मृतीदिन आहे. तर, आजच्या दिवशी भारताने विकसित केलेला आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. त्याशिवाय इतरही मोठ्या घडामोडी आजच्या दिवशी घडल्या आहेत. वाचा सविस्तर