Mustard Procurement : नाफेडकडून मोहरीची खरेदी सुरु, हरियाणासह राजस्थान आघाडीवर; खुल्या बाजारापेक्षा MSP अधिक
Mustard Procurement : सध्या देशात नाफेडकडून मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे.
Mustard Procurement : सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची (Wheat) मोठ्या प्रमामात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने (Nafed) 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा (Haryana) पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मोहरीला MSP पेक्षा खुल्या बाजारात दर कमी
सध्या देशात गव्हाची काढणी जोरात सुरू आहे. त्याचबरोबर मंडईंमध्येही गहू खरेदी सुरु झाली आहे. मात्र, देशात फक्त गहूच खरेदी केला जातो असे नाही. एमएसपीवर इतर पिकांची खरेदीही सुरू करण्यात आली आहे. आता देशात एमएसपीवर मोहरी खरेदी केली जात आहे. मोहरी बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांनंतर खुल्या बाजारातील भाव एमएसपीपेक्षा कमी आहेत. त्यामुळं शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर मोहरीची विक्री करत आहेत. सरकार शेतकऱ्यांना तात्काळ पैसेही दिले जात आहेत.
1.69 लाख मेट्रिक टन मोहरीची खरेदी
देशात वेगानं मोहरीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत नाफेडने 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. आकडेवारीनुसार, देशातील 84914 शेतकऱ्यांनी सरकारला एमएसपीवर मोहरी विकली आहे. याचे शेतकऱ्यांना 922.24 कोटी रुपये मिळाले आहेत. मोहरी खरेदीत हरियाणा हे राज्य अव्वल आहे.
हरियाणात मोठ्या प्रमाणावर मोहरीची खरेदी
राजस्थानमध्ये मोहरीचे सर्वाधिक उत्पादन होते. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे. देशातील 13.5 टक्के मोहरीचे उत्पादन हरियाणात होते. नाफेडच्या म्हणण्यानुसार, हरियाणामध्ये 20 मार्चपासून 5440 रुपये प्रति क्विंटल एमएसपी दराने मोहरीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत 139226.38 मेट्रिक टन मोहरीची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 758.78 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. तेलबिया पिकांपैकी 26 टक्के मोहरीचा समावेश होतो. राजस्थान हे देशातील 42 टक्के मोहरीचे उत्पादन करणारे राज्य आहे. पण जेवढे उत्पन्न येथे आहे. राजस्थानमध्ये आत्तापर्यंत 4708 मेट्रिक टन मोहरीची खरेदी झाली आहे.
गुजरात, मध्य प्रदेशातही खरेदी सुरू
देशातील 12 टक्के मोहरीचे उत्पादन मध्य प्रदेशात तर 4.2 टक्के गुजरातमध्ये होते. मध्य प्रदेशात 9977.74 मेट्रिक टन मोहरीची खरेदी करण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये 15293.43 मेट्रिक टन मोहरीची खरेदी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: