एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसाळ्यात बीचवर फिरायला जाताना या 11 गोष्टी लक्षात ठेवा!
व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरिन यांनी प्रवाशांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.
गोवा : गोव्याच्या विविध भागांमध्ये मध्यम आणि जोरदार पाऊस खूप जोमाने चालू आहे. या काळात राज्य नियुक्त व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरिन यांनी प्रवाशांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.
‘दृष्टी’चे 600 जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यांवर पूर्ण वर्षभर असतात. आगामी मान्सून आणि सध्याच्या हवामानामुळे सर्व सुमद्रकिनाऱ्यांवर ‘दृष्टी’च्या देखरेखीखाली रेड फ्लॅग्स लावले आहेत, जे न पोहण्यासाठी असेलेल्या जागांबद्दल सूचित करतात.
गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे प्रवाशांनी समुद्रात उतरू नये. सर्व समुद्र किनाऱ्यांवर रेड फ्लॅग्स लावले आहेत, जेणेकरुन पर्यटकांना सूचना मिळेल. जीवरक्षकांकडून समुद्र किनाऱ्यावर हवामानाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला जातो. त्यानंतर उग्र हवामानातही बचावासाठी प्रशिक्षण दिलं जातं, अशी माहिती दृष्टी मरिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर यांनी दिली.
समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी आपल्या मुलांना एकटं न सोडण्याचा सल्लाही ‘दृष्टी’ने दिला आहे.
गोवा सरकारकडून पावसाळ्यात (जून ते ऑगस्ट) विविध जलक्रीडांवर तात्पुरती बंदी घालण्यात येते. या काळात समुद्र खवळलेला असतो. शिवाय पावसामुळे लाटांचा वेगही अधिक असतो. 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा मासेमारी बंदीचा काळ पाळला जातो, ज्यात सुमारे 1500 ट्रॉलर्स आपले जाळे काढून ठेवणार आहेत.
पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर ही काळजी घ्या
जे समुद्रावर जात आहेत त्यांनी पाण्यापासून किमान 10 मी. अंतर ठेवावे आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
जर ओहोटी असेल किंवा पाऊस नसेल तर गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी किंवा लाल आणि पिवळा ध्वज चिन्हांकित केलेल्या ठिकाणी जाऊ नये.
समुद्रावर गेलेल्या लोकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि पाण्याला ओहोटी असली तरी देखील त्यांना एकटे पाण्यात सोडू नका
दुपारी 12 ते 4 पर्यंत समुद्रात जाऊ नये. दुपारच्यावेळी समुद्र खवळलेला असतो कारण यावेळी वाऱ्याची गती जास्त असते.
जीवरक्षक किंवा लोकं नसलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा समुद्रकिनाऱ्यावर जावे व एकटे पोहणे टाळावे. या ठिकाणी जीवरक्षक असतात.
ज्यावेळी जीवरक्षक जीपवर असलेल्या पब्लिक अॅड्रेस सिस्टमद्वारे लोकांना सूचना देतात त्यावेळी सतर्क राहणे गरजेचे आहे.
गडगडाटासह वीज जेव्हा येते अशावेळी समुद्रावर जाणे टाळावे कारण वीजेमुळे धोका निर्माण होऊ शकतो.
ओहोटीवेळी दगडांवर जाऊ नये कारण मान्सूनमध्ये दगडांवर घसरण्याची भीती असते.
जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांच्या कालावधीत समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा करणे चुकीचे आहे. कारण, समुद्र शांत वाटत असेल तरीही अचानक मोठी लाट आपल्यावर येऊन खोल पाण्यात नेऊ शकते.
जर मद्य केलेले असेल तर पाण्यात जाऊ नये.
नेहमी समुद्राच्या प्रवेशद्वारांवर संरक्षणासाठी असलेली चिन्हे वाचून जावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement