एक्स्प्लोर

भारतीय सैन्याच्या तीन डिव्हिजन लडाखकडे

पंधरा दिवसांपूर्वी चीनने केलेल्या आगळिकीमुळे तब्बल 20 भारतीय जवान शहीद झाले होते. आता चीनने कसलीही कुरापत काढू नये यासाठीच भारताने या परिसरातील सैन्याची उपस्थिती वाढवली आहे.

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने सैन्यदलाच्या तीन डिव्हिजन लडाख सेक्टरकडे पाठवल्या आहेत. यामध्ये अनेक स्क्वाड्रन्स आणि रणगाडे असल्याचं सांगितलं जातंय. चीनने एलएसीच्या परिसरात पहिल्यापासून सैन्याची मोठी जमवाजमव केली असल्यामुळे भारतानेही आता त्याला उत्तर म्हणून या परिसरातील सैन्याची हालचाल वाढवली आहे. हिंदुस्थान टाईम्स ऑनलाईन आवृत्तीत भारतीय लष्कराच्या हालचालीचं वृत्त प्रकाशित झालंय, पंधरा दिवसांपूर्वी चीनने केलेल्या आगळिकीमुळे तब्बल 20 भारतीय जवान शहीद झाले होते. आता चीनने कसलीही कुरापत काढू नये यासाठीच भारताने या परिसरातील सैन्याची उपस्थिती वाढवली आहे. लडाख  परिसरात सध्या भारताची तीस हजार सैन्याची कुमक आहे. हे सर्व सैनिक हिमालयातील अत्युच्च ठिकाणी आणि ऑक्सिजन विरळ असलेल्या ठिकाणी तैनातीसाठी खास प्रशिक्षण दिलेलं आहे. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर वायुदलाची ताकद वाढणार; 6 राफेल विमानं लवकरच भारतात दाखल होणार लडाखच्या परिसरातील भारतीय सैन्याची जमावाजमव ही लष्कराच्या राखीव कोट्यातील सैन्यातून करण्यात आली आहे. राखीव सैन्य दलातील जवान हे डोंगरदऱ्यातील तैनातीसाठी विशेष प्रशिक्षित असतात. विमाने आणि बसच्या माध्यमातून लडाखमध्ये ही सैन्यदलाची ही अतिरिक्त कुमक पाठवली जात आहे. दरम्यान काल भारत आणि चीन यांच्यातील कमांडर स्तरावर तब्बल दहा तास चर्चा झाली. पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्याच्या परिसरात यापुढे दोन्ही सैन्यांमध्ये हिंसक झटापटी होणार नाहीत, तसंच दोन्ही देशांच्या जवानांदरम्यान वारंवार शाब्दिक बाचाबाचीही होणार नाही, यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा होत आहे. तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतरही अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. आता चीनकडूनही भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे या बैठकीत चीन वारंवार एलएसीबाबत नवनवे दावे करत आहे आणि कोणतीही एक सीमा निश्चित मानत नसल्याचं उघड झालंय. तसंच चीनी सैन्याने एलएसी परिसरात आणि गलवान खोऱ्यात वाढवलेली सैन्य कुमक मागे घ्यावी असा या कमांडर स्तरीय चर्चेत भारताचा आग्रह राहिलेला आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेतून तोडगा निघाला नाही तर एलएसीवरील सैन्य दलाची तैनाती सप्टेंबरपर्यंतही राहू शकते असं काही जाणकारांना वाटतं. सप्टेंबरनंतर या परिसरात वाढणाऱ्या थंडीमुळे दोन्ही देशांना सैन्य तैनातीवर फेरविचार करावा लागेल, असं जाणकारांना वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Chandrakant Patil On Fees Regulating Authority ACT: सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
Kaziranga Accident: आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget