एक्स्प्लोर
मनमोहन सिंह यांना यंदाचा 'इंदिरा गांधी शांती' पुरस्कार
इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे सचिव सुमन दुबे यांनी ही माहिती दिली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना यावर्षीच्या इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सलग दहा वर्षे देशाचं नेतृत्त्व करत जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून मनमोहन सिंह यांचं नाव सर्वानुमते निवडण्यात आलं. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे सचिव सुमन दुबे यांनी ही माहिती दिली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. जागतिक शांती आणि विकासामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार 1986 सालापासून देण्यात येतो. गेल्या वर्षीचा पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार टी. एम. कृष्णा यांना देण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement