Video : तिकडं, पाकिस्तानविरोधात पडद्यामागून तयारी अन् इकडं भारताने गंगा एक्स्प्रेसवेवर विराट शक्ती दाखवली! राफेल, जग्वार आणि मिराजने केलं उड्डाण
Ganga Expressway : ही विमाने गंगा एक्सप्रेसवेवर दिवसा टच अँड गो लँडिंगसह नाईट व्हिजन गाईडेड लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

Ganga Expressway in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवरील 3.5 किमी लांबीची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेने गुंजली. राफेल, मिराज-2000 आणि जग्वार सारखी लढाऊ विमाने एक्सप्रेसवेच्या आकाशात उडताना दिसली. हवाई दल आज (2 मे) संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या धावपट्टीवर रात्रीच्या लँडिंगचा ऐतिहासिक सराव करणार आहे. हा सराव देशातील अशा प्रकारचा पहिलाच रात्रीचा लष्करी हवाई कार्यक्रम आहे, जो एक्सप्रेसवेवर केला जाईल. अशाप्रकारे, गंगा एक्सप्रेसवे आता केवळ रस्त्यांचाच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा कणा बनला आहे.
भारतीय हवाई दलाच्या सरावात तीन प्रमुख लढाऊ विमानांचा समावेश आहे. यामध्ये राफेल, मिराज-2000 आणि जग्वार यांचा समावेश आहे. ही विमाने गंगा एक्सप्रेसवेवर दिवसा टच अँड गो लँडिंगसह नाईट व्हिजन गाईडेड लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
#WATCH | Shahjahanpur: The Indian Air Force (IAF) carrying out a flypast on the Ganga Expressway in Uttar Pradesh. The Air Force is conducting take-off and landing exercises here.
— ANI (@ANI) May 2, 2025
The exercise is being organised to assess the expressway’s potential as an alternative runway… pic.twitter.com/MugSdRDBHd
भारतीय हवाई दलाने धावपट्टी ताब्यात घेतली
अधिकाऱ्यांच्या मते, लढाऊ विमाने देखील येथे सराव करू शकतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, एअर शोच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने धावपट्टी आपल्या अधिकारक्षेत्रात घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी एअर शो आयोजित केला जाईल, जेणेकरून रात्रीच्या वेळी धावपट्टीवर विमाने उतरवण्याची क्षमता देखील तपासता येईल.
VIDEO | Uttar Pradesh: Preparations underway for IAF's drill on 3.5-km airstrip of the under-construction Ganga Expressway in Shahjahanpur. Visuals of an IAF aircraft at the spot.#UPNews #GangaExpressway
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/krCg0SV4KS
बरेली येथील हवाई दल केंद्रावरून लढाऊ विमाने आली
शो दरम्यान, चाचणी म्हणून धावपट्टीवर एक मीटर उंचीवर लढाऊ विमाने उडतील आणि त्यानंतर ही विमाने धावपट्टीवर उतरतील आणि नंतर उड्डाण करतील. त्यांच्या मते, येथे पुन्हा संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सराव केला जाईल आणि सर्व लढाऊ विमाने बरेली येथील हवाई दल केंद्रावरून येतील.
इतर महत्वाच्या बातम्या























