एक्स्प्लोर

Tesla India Launch Confirmed: टेस्लाची 2021 च्या सुरूवातीला भारतात होणार एन्ट्री, नितीन गडकरींकडून स्पष्ट

बऱ्याच भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल वाहनांवर काम करत आहेत, ज्यांच्या किंमती कमी करता येतील. तथापि, टेस्ला तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : अमेरिकन इलेक्ट्रिक व्हेईकल अँड क्लीन एनर्जी कंपनी टेस्ला 2021 च्या सुरुवातीस भारतात कार्यरत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सोमवारी इंडियन एक्स्प्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे सांगितले. या दरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या गरजेवर चर्चा केली आणि सांगितले की आणखी बऱ्याच भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल वाहनांवर काम करत आहेत, ज्यांच्या किंमती कमी करता येतील. तथापि, टेस्ला तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, असं गडकरी यांनी म्हटलं.

पुढे गडकरी म्हणाले की, टेस्ला विक्रीसह त्याचे कामकाज सुरू करेल आणि त्यानंतर या कारबद्दल लोकांच्या प्रतिसादाचा विचार करता, ते त्याच्या असेंबल आणि उत्पादनाबद्दल विचार करतील. येत्या 5 वर्षांत भारत नंबर एक चे उत्पादन केंद्र बनणार आहे.

अहवालानुसार, जगातील सर्वात वॅल्यूड ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनने मार्केट कॅपनुसार पुढील महिन्यात बुकिंग पुन्हा सुरू करण्याचे सांगितले आहे. 2021 मध्ये टेस्ला भारतात लॉन्च होईल. टेस्लाची देखील देशात आर अँड डी सेंटर आणि बॅटरी उत्पादक कंपनी उघडण्याची योजना आहे. तथापि, कंपनीने 2016 मध्येच मॉडेल 3 च्या प्री-बुकिंग सुरू करत भारतात प्रवेश करण्याची योजना केली होती.

जून 2021 पर्यंत त्याचे एस 3 मॉडेल भारतीय बाजारात आणण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी एबीपी न्यूजला दिली.  जानेवारीत भारतात येणार का? या ट्वीटला एलॉन मस्कने उत्तर दिलंय. "जानेवारीत नाही, पण 2021 मध्ये नक्की", असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

भारत लाँचिंगला उशीर 2016 मध्ये, कंपनीने भारतात येण्याची योजना आखली होती आणि एस 3 मॉडेलसाठी बुकिंग घेणे सुरू केले. परंतु योग्य पायभूत सुविधांच्या अभावामुळे आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या इकोसिस्टममुळे ते होऊ शकले नाही. या विलंबासाठी कंपनीने भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीच्या (एफडीआय) निकषांना जबाबदार धरले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Embed widget