एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी घुसले!
नवी दिल्ली : एएनआयच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे 250 हून अधिक दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकआधी 250 हून अधिक लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसले आहेत, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी केला आहे.
गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सच्या वेशात लष्करचे दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमाच्या लॉन्चिंग पॅडवर फिरत होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील लष्करचा कमांडर साजिद जट नोमी मोठी हल्ल्याचे आदेश देत आहे.
नोमीच्या इंटरसेप्ट खुलाशामुळे भारताची चिंता वाढली आहे. नोमी हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा सर्वात जवळचा लष्कर कमांडर आहे. काश्मीर खोऱ्यातील लष्कर कमांडर अबू दुजाना यावेळी सर्वात मोछ्या दहशतवादी गटाचे नेतृत्त्व करत आहे.
अबू दुजानाने लष्करच्या दहशतवाद्यांचे काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी 3 गट बनवले आहेत. यामधील एक गटाला एक महिला लष्कर कमांडर लीड करत आहे.
गुप्त अहवालामधील काय म्हटलंय?
1. दहशतवाद्यांचा एका गटाला फातिमा नावाची लष्कर असोसएट लीड करत आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानकडून ही महिला लष्करच्या कमांडरकडून सूचना मिळत आहे.
2. दहशतवाद्यांचा दुसरा गट उसामा जहाँगीर लीड करत आहे.
3. तिसऱ्या गटाला लष्करचा दहशतवादी हम्माद लीड करत आहे.
हे तीनही दहशतवादी अबू दुजानाकडून सूचना मिळवत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी अबू दुजानाचे इंटरसेप्ट पकडले आहेत. या गुप्त इंटरसेप्टमधून खुलासा झाला आहे की, सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी 'कारवाई' नावाच्या कोडचा वापर करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 'कारवाई'चा अर्थ हल्ल्याचा आदेश आहे.
भारताच्या सीमा पूर्णपणे सील करण्याच्या हालचाली सुरु असताना, शस्त्रांसाठी भारतातील सुरक्षा दलांकडून एके-47 शस्त्र हिसकावून घेण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये बसून लष्कर कमांडर सैफुल्ला साजिद जट नोमी हे सर्व आदेश देत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्जिक स्ट्राईकनंतर दहशतवादी एलओसीऐवजी आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळून भारतात घुसखोरी करु शकतात. गुप्तचर यंत्रणांनी दोन लॉन्चिंग पॅड, जे आंतरराष्ट्रीय सीमेवर असतात, तिथे काही हालचाली पाहिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा पाहणारी बीएसएफला सुरक्षेच्या दृष्टीने सक्त आदेश देण्यात आले आहेत. सीमेवरील नदी, नाले, जे पाकिस्तानशी जोडले आहेत, तिथे चौकशी वाढवण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement