तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; 24 तास दुकानं खुली ठेवण्यास परवानगी, अध्यादेश जारी
Telangana Government Amended Act: तेलंगणात आता सर्व दुकानं 24 तासांसाठी खुली राहणार आहेत. तेंलगणा सरकारच्या वतीनं अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
![तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; 24 तास दुकानं खुली ठेवण्यास परवानगी, अध्यादेश जारी telangana govt big decision to keep commercial shops open 24 hours permission what does the new gr say about this find out तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; 24 तास दुकानं खुली ठेवण्यास परवानगी, अध्यादेश जारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/e28f430b19053bb4521d7d5526d350781674478743592233_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telangana Government Amended Act: तेलंगणा सरकारनं (Telangana Government) राज्यातील दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. तेलंगणा सरकारनं राज्यभरातील दुकानं 24 तास खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. दुकाने आणि स्थापना कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन काही नियम आणि अटीअंतर्गत ही परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी यासंदर्भातील अध्यादेश तेलंगणा सरकारकडून जारी करण्यात आला आहे. अध्यादेशात नमूद करण्यात आलेल्या तरतुदींनुसार, तेलंगणात आता दुकानं 24/7 सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अध्यादेशात नमूद करण्यात आल्यानुसार, तेलंगणा सरकार काही अटी-शर्थींच्या आधारे उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेशी संबंधित असलेल्या तेलंगणा दुकानं स्थापना कायदा 1988 च्या कलम 7 मधून सूट देत आहे. तसेच, अटींमध्ये ओळखपत्र जारी करणं, साप्ताहिक सुट्टीची तरतूद, साप्ताहिक कामकाजाचे तास पाळणं, ओव्हरटाईम मजुरी देणं आणि अधिसूचित राष्ट्रीय/उत्सवांच्या सुट्टीवर कर्तव्यावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेतनासह भरपाईच्या सुट्टीची तरतूद करणं यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
व्यावसायिक संस्था आणि दुकानदार पोलिसांच्या नियमांना बांधिल
व्यावसायिक संस्था आणि दुकानदारांनी आपल्या व्यावसायिक कामाचा लेखाजोखा ठेवून तो शासनाकडे सादर करणं आवश्यक आहे. हे सर्व राज्य सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या कालमर्यादेच्या आत सादर करणं अनिवार्य असणार आहे. तसेच पोलिसांनी घालून दिलेले नियम आणि कायदे यांचं पालनही व्यावसायिक संस्था आणि दुकानरांना करावं लागणार असल्याचं तेलंगणा सरकारनं जारी केलेल्या शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
महिला कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या संदर्भात काही नियम
ज्या व्यावसायिक संस्थेत किंवा शॉपमध्ये महिला कर्मचारी काम करतात, त्यांच्या अतिरिक्त सुरक्षिततेची काळजी आणि उपायोजना करणं, महिला कर्मचाऱ्यांच्या परवानगीनंच रात्रपाळीचं काम देणं आणि रात्रपाळीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी घरापासून ते कामच्या ठिकाणापर्यंत येण्या-जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करणं अनिवार्य असणार आहे. तसेच या नव्या अध्यादेशात, शासनाकडे व्यावसायिकांना दरवर्षी 10,000 हजार रूपये जमा करणं आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)