Telangana Election Result 2023 : केसीआर पुन्हा मुख्यमंत्री होणार? काँग्रेस सत्तापालट करणार? मतमोजणीला सुरुवात; भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट
Telangana Assembly Election Results 2023: महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना धक्का बसणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.
LIVE

Background
Telangana Election Results 2023 : तेलंगणातील कामारेड्डीत काँग्रेसचे रेवंत रेड्डी आघाडीवर; केसीआर पडले मागे
Telangana Election Results 2023 : कामरेड्डी मतदारसंघातून तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे केसीआर यांच्यापेक्षा 1768 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत 9 फेऱ्यांची मोजणी झाली असून, एकूण 19 फेऱ्यांची मोजणी बाकी आहे.
Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या म्हणाले,"अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागेल"
Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चार राज्यांच्या निकालाबाबत बोलताना सांगितले की,"आम्ही तेलंगणात आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आमच्या अंदाजानुसार आम्ही तेलंगणा आणि छत्तीसगड जिंकत आहोत. आम्हाला वाटले होते की तिथे मध्य प्रदेशातही स्पर्धा होईल. मात्र, अंतिम निकाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे वाट पहावी लागेल."
Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे डेप्युटी सीएम डीके शिवकुमार म्हणाले,"तेलंगणाच्या जनतेने केसीआरला उत्तर दिले आहे"
Telangana Election Results 2023 Reactions Live : तेलंगणा निवडणुकीच्या निकालांवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले,"राज्यातील जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. प्रगतीसाठी बदल झाला पाहिजे. रेवंत रेड्डी हे टीम लीडर आहेत. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल. ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली होणार आहे. हा निकाल आहे. मी केसीआर किंवा केटीआरवर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, तेलंगणातील जनतेने त्यांना उत्तर दिले आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर; केसीआर दुसऱ्या क्रमांकावर
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. केसीआर दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस आघाडीवर आहे.
काँग्रेस-65
BRS-39
भाजप-10
इतर-5
Telangana Election Results 2023 : तीन फेऱ्यांमध्ये पुढे आहोत, आता चौथ्यासाठी मतमोजणी सुरू आहे : गोशामहलचे उमेदवार आणि भाजप नेते टी. राजा सिंह
Telangana Election Results 2023 : गोशामहल मतदारसंघातील भाजप नेते टी. राजा सिंह म्हणाले, "मी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत पुढे होतो, सध्या चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
