KCR on PM Modi : 'आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच', तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
Telangana CM KCR Attacked on PM Modi : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे.
Telangana CM KCR Attacked on PM Modi : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलेय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले. नऊ राज्यातील तुम्ही सरकारं पाडत एक प्रकारे विक्रमच केलाय, अशी बोचरी टीका के चंद्रशेखर राव यांनी केली. तसेच केंद्र सरकारने आश्वासने पूर्ण न केल्यामुळे प्रश्नचिन्हही उपस्थित केले.
के चंद्रशेखर राव यांच्याकडून नियमांचं उल्लंघन -
तेलंगाणाचे के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचे स्वागत केले. दुसरीकडे ते विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत न करत त्यांनी शासकीय शिष्टाचारचं उल्लंघन केल्याचं म्हटले जातेय.
यशवंत सिन्हा यांचं कौतक -
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी विरोधीपक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचं कौतक केलं. ते म्हणाले की, 'दोन्ही उमेदवाराची तुलना करायला हवी. तुमच्या विजयाने देशाची मान उंचावेल. आज देशात अनेक चुकीचे विषय आणि घटना घडत आहेत. परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.'
पंतप्रधान सरकारे पाडण्यात व्यस्त -
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त आहात. आतापर्यंत तुम्ही नऊ सरकारे पाडली आहेत. तुम्ही हा एक विक्रमच केलाय.
भाजपचं हैदराबादमध्ये मंथन, पंतप्रधान मोदींसह 19 मुख्यमंत्री राहणार उपस्थित -
शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बौठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे 19 मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. हैदराबादमध्ये कार्यकारणीची बैठक घेत भाजप दक्षिणेत पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) आणि AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये घुसण्याचा हा भाजपा प्रयत्न असणार आहे. दोन दिवसांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय गृह मंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित आहेत. भाजपशासित राज्यातील 19 मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याचं समजतेय.