एक्स्प्लोर

TCS Recruitment | कोरोना काळात आनंदाची बातमी; टिसीएस कंपनी 40 हजार फ्रेशर्सला देणार नोकरी

कोरोनाच्या संकट काळातही भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीने यावर्षी नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत देखील ही नोकर भरती होणार आहे.

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. खाजगी क्षेत्रात सर्वात जास्त नोकऱ्या देणारी आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टिसीएस (TCS) वर्ष 2021-2022 मध्ये 40 हजाराहून अधिक फ्रेशर्स लोकांना संधी देणार आहे. मागील वर्ष लॉकडाऊन असतानाही टिसीएसने 40 हजार लोकांची नोकर भरती केली आहे. यामुळे आता कंपनीत 5 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांची संख्या झाल्याचे टिसीएसने सांगितलंय.

पाच लाखाहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या टिसीएसने 2020 मध्ये कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची नियुक्ती केली होती. या संख्येत यावर्षी अधिक भर घालणार असल्याचे कंपनीचे जागतिक एच आर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, की सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारी अनेक निर्बंध आहेत. मात्र, यामुळे नोकरी घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. गेल्या वर्षी एकूण 3 लाख 60 हजार फ्रेशर्सनी ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिली आहे. “मागील वर्षी आम्ही भारतातल्या कॅम्पसमधून, 40 हजार पदवीधरांची निवड केली. आम्ही यावर्षी भारतातून 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त फ्रेशर्सला संधी देणार आहोत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून 2 हजार प्रशिक्षणार्थींवरही कंपनी चांगली कामगिरी करेल, असे त्यांनी सांगितले.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, देशात टॅलेंटची कोणतीही कमतरता भासत नाही. ते म्हणाले, की भारतीयांचे कौशल्य आणि कार्यसंस्कृती लक्षात घेता या प्रतिभेला “अभूतपूर्व” म्हटले पाहिजे.

कोरोनातही नोकर भरती
कोरोनामुळे जून 2020 महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यानंतर देखील कंपनीने 40 हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही 40 हजार रोजगार दिले आहोत.

टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या 10 बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी 2014 पासून 20 हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget