एक्स्प्लोर

Tata-Mistry Case : सायरस मिस्त्री यांना दिलासा, त्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट करणार पुनर्विचार

Tata-Mistry Case : सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढलेल्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट करणार पुनर्विचार करणार आहे.

Tata-Mistry Case : सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढलेल्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट करणार पुनर्विचार करणार आहे. या प्रकरणाची 9 मार्च 2022 रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. 26 मार्च 2021 रोजी दिलेल्या निर्णायावर सुप्रीम कोर्टा पुनर्विचार करणण्याचा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये टाटा समुहाने सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार केले होते. याप्रकरणी सायरस मिस्त्री यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी कोर्टाने टाटा समुहाच्या बाजूने निर्णय दिला होता. 

मुख्य न्यायाधीश एनव्ही रमण, न्यायाधीश एएस बोपन्ना आणि न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम या तीन जणांच्या खंडपीठाने 2:1 च्या बहुमताने 15 फेब्रुवारीच्या पुनर्विचार याचिकाला सहमती दर्शवली आहे. 9 मार्च रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

2016 साली सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून काढलं होतं
सहा वर्षापूर्वी 2016 मध्ये, सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून काढण्यात आलं होतं.  त्याविरोधात सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला आव्हान दिलं होतं. डिसेंबर 2019 मध्ये NCLAT ने मिस्त्रींना अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं होतं. ते पद त्यांना परत देण्यात यावं असंही सांगितलं होतं. टाटा ग्रुपने या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने NCLAT च्या आदेशाला स्थगिती दिली होती. 26 मार्च 2021 सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर सायरस मिस्त्री राहू शकत नाहीत, असा निर्णय दिला होता. दुसरीकडे शपूरजी पालनजी ग्रुपनेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं होतं की मिस्त्रींना ज्या नियमांच्या आधारे काढण्यात आलं होतं त्या नियमांना NCLAT ने रद्द केलं नव्हतं. त्यामुळे भविष्यातही असा निर्णय होऊ शकतो. 

दरम्यान, सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या

UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget