तामिळनाडूत निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या स्मृती इराणी यांचं पारंपरिक संगितावर नृत्य, व्हिडीओ व्हायरल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी (Smriti Irani) तामिळनाडू मध्ये (Tamilnadu) एका पारंपरिक नृत्यात सहभाग घेतला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
चेन्नई : तामिळनाडूत निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी एका पारंपरिक संगीतावर नृत्याचा ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी शनिवारी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूत गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या उमेदवार वनती श्रीनिवासन यांच्या प्रचार दौऱ्यात त्यांनी भाग घेतला. यावेळी स्मृती इराणींनी दुचाकी गाडीची स्वारीही केली. त्यानंतर स्मृती इराणींनी गुजराती महिलांनी आयोजित केलेल्या कोलत्तम नृत्यातही भाग घेतला.
या व्हिडीओत आपण पाहू शकता की स्मृती इराणी या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसोबत पारंपरिक नृत्य करत आहेत. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीय समुदाय संपर्क कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांना संबोधित केलं.
View this post on Instagram
भाजप महिला मोर्चाने राजा स्ट्रीट परिसरात एक निवडणूक प्रचार यात्रा आयोजित केली होती. यावेळी वनती श्रीनिवासन देखील त्यांच्या सोबत होत्या. वनती श्रीनिवासन या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि वनती श्रीनिवासन यांनी नंतर एका ऑटोरिक्षाच्या माध्यमातून प्रवास केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी नारेबाजी केली.
संबंधित बातम्या :