Ratan Tata vs Nira Radia Case : सुप्रीम कोर्टात रतन टाटा यांच्या याचिकेवर सुनावणी, 8 वर्षानंतर राडिया टेप लीक प्रकरणावर होणार सुनावणी
Ratan Tata vs Radia Tapes : निरा राडिया यांच्याशी संबंधित ऑडिओ लीकप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
Ratan Tata vs Radia Tapes : निरा राडिया यांच्याशी संबंधित ऑडिओ लीकप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. 2010 मधील प्रकरणावर ही सुनावणी होत आहे. निरा राडिया यांच्याशी झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप लीक होणं आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद रतन टाटा यांनी केला आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात याची सुनावणी होत आहे.
रतन टाटा यांनी 2010 मध्ये सुप्रीम कोर्टात ऑडिओ क्लिप लीक प्रकरणात धाव घेऊन दाद मागितली होती. या प्रकरणी सरकारचा चौकशी अहवाल समाधानकारक नसल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले होते. 2014 मध्ये या प्रकरणाची अखेरची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता आठ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी होत आहे.
ऑगस्ट 2012 मध्ये उद्योगपती रतन टाटा यांनी सरकारने फोन कशा पद्धतीने टॅप करण्यात आले यासंबंधी दाखल केलेल्या अहवालाची प्रत मागितली होती. त्यामध्ये ऑडिओ क्लीप लीक कशी झाली, याबाबतची माहिती होती. या प्रकरणाला त्यानंतर राडिया टेप प्रकरण म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ऑडिओ क्लिपमध्ये निरा राडिया यांनी अनेक उद्योजक, पत्रकार आणि सरकारी अधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संवाद साधला होता. नीरा राडिया यांच्यासोबत रतन टाटा यांची ऑडिओ क्लीप 2010 मध्ये मीडियासमोर आली होती. त्यानंतर ते सरकारविरोधात कोर्टात गेले होते. ऑडिओ क्लिप लीक होणं आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद केला होता.
#SupremeCourt to hear writ petition filed by Ratan Tata in 2010 seeking right to privacy following the leaks of Nira Radia tapes. pic.twitter.com/p991CwnO3q
— Live Law (@LiveLawIndia) September 1, 2022
नीरा राडिया प्रकरण काय?
कॉर्पोरेट दलाल नीरा राडिया यांची कंपनी वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स टाटा समूह आणि मुकेश अंबानी यांच्या कंपनीसाठी जनसंपर्क करत असल्याचा दावा केला होता. ही कंपनी आता अस्तित्वात नाही. 2010 मध्ये नीरा राडिया वेगवेगळ्या उद्योगपती, राजकीय नेते, अधिकारी आणि पत्रकारांसोबत चर्चा झाली होती. यावेळी जवळपास 800 टेप्स मीडियामध्ये प्रकाशित झाले होते. या ऑडिओ लीकनंतरच 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात राडिया यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला होता.