एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
तहानलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणात काल (30 ऑक्टोबर) सकाळी पाणी सोडण्यात येणार होतं. परंतु पाणी सोडण्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 29 ऑक्टोबरला सुनावणी झाली. कोर्टाने 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली.
नाशिक : अहमदनगर आणि नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
तहानलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणात काल (30 ऑक्टोबर) सकाळी पाणी सोडण्यात येणार होतं. परंतु पाणी सोडण्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 29 ऑक्टोबरला सुनावणी झाली. कोर्टाने 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली आहे.
नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीमुळे तहानलेल्या मराठवाड्याला पाण्यासाठी दोन दिवस आणखी प्रतीक्षा करावी लागली.
एकूण किती पाणी सोडणार?
जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दलघमी (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दलघमी (2.04 टीएमसी), पालखेड समुहातून 170 दलघमी (60 टीएमसी) असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement