एक्स्प्लोर

Kejriwal : सुप्रीम कोर्टाचा केजरीवालांना झटका, अंतरिम जामीन मुदतवाढ अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार, पर्याय काय?

Arvind Kejriwal : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विषयक तपासण्यांसाठी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला होता.

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे.  अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर केजरीवालांचा अर्ज मांडण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांचा अर्ज ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात मांडला होता. अभिषेक मनू सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला एका आठवड्याची मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज न्यायालयात सादर केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला. 

न्यायमूर्तींनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली असून या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळं अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्ज मुदतवाढीचं प्रकरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढं योग्य निर्णयासाठी मांडावं, असं  खंडपीठीनं म्हटलं. 

अरविंद केजरीवालांच्या अंतरिम जामिनाची मुदत 1 जूनपर्यंत 

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ईडीनं केजरीवाल यांना 21 मार्चला अटक केलं होतं. अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात अटकेच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे  रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. 

अरविंद केजरीवाल यांना 10 मे ते 1 जून या कालावधीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. अरविंद कजेरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण करावं असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला होता. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या अंतरिम जामिनाची मुदत संपण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विषयक तपासणीसाठी अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. 

अरविंद केजरीवाल यांचं अटकेच्या कारवाईनंतर 7 किलोनं वजन घटलं आहे. कीटोन लेवल देखील वाढलेली आहे, ही गंभीर आजाराची लक्षण असू शकतात. काही डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे.PET-CT स्कॅन आणि काही टेस्ट करण्याची गरज आहे. त्यामुळं सात दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टातील अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेच्या अर्जाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना अटक करण्यात आलेली आहे. तर, खासदार संजय सिंह यांना या प्रकरणात जामीन मिळालेला आहे. 

संबंधित बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Embed widget