एक्स्प्लोर

मराठमोळे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान, राष्ट्रपतींंनी दिली शपथ

न्यायामूर्ती शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार सांभाळणार आहेत. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे आज (18 नोव्हेंबर) आपल्या पदाची शपथ घेतील. रंजन गोगोई 13 महिने देशाचे सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळानंतर सेवानिवृत्त झाले आहेत.

नवी दिल्ली : सरन्यायाधीय रंजन गोगई रविवारी (17 नोव्हेंबरला) सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायामूर्ती शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार सांभाळला आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज (18 नोव्हेंबर) सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पदाची शपथ दिली. शरद बोबडे देशाचे 47 वे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती शरद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होतील.

न्यायमूर्ती बोबडे यांनी देशातील अनेक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या घटनापीठातही शरद बोबडे यांचा समावेश होता. या प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते. रंजन गोगोई 13 महिने देशाचे सरन्यायाधीश पदाच्या कार्यकाळानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. 2018 च्या जानेवारी महिन्यात तत्कालिन सरन्यायाधीशांविरोधात ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या 4 वरिष्ठ न्यायमूर्तींमध्ये गोगोई होते. राफेल, सबरीमला या गेल्या काही दिवसांतल्या महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल गोगोई यांनी दिला.

न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अल्पपरिचय

  • न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला.
  • नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी घेतली.
  • 1978 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये सामील झाले.
  • यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायद्याची प्रॅक्टिस केली, तर 1998 मध्ये वरिष्ठ वकील बनले.
  • 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.
  • 2013 मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत.
  • 18 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीशांच्या शिफारशींना केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु होईल.

कोणत्या मोठ्या निकालांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे यांचा समावेश?

  • सुप्रीम कोर्टाने आधार कार्डसंदर्भात दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती एस. एस. बोबडे यांचाही समावेश होता. आधार कार्डशिवाय कोणताही भारतीय नागरिक सुविधांपासून वंचित राहू शकत नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं होतं. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती नागप्पन यांचा समावेश होता.
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं, त्याचा तपास सुप्रीम कोर्टाचेच तीन न्यायमूर्ती करत होते. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, एन व्ही रमण आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश होता.
  • नोव्हेंबर, 2016 मध्ये तीन मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. या निकालात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेही सामील होते. त्याच्यासोबत या खंडपीठात तत्कालीन सरन्यायाधीश टीएस ठाकूर, न्यायमूर्ती एके सीकरी हे देखील होते.
  • मागील चाळीस दिवसांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाती दररोज सुनवाणी करणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पीठात एस ए बोबडेही सहभागी होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नजीर यांचा समावेश होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय येणं अद्याप बाकी आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget