एक्स्प्लोर

EWS Reservation: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण? घटनापीठासमोर आजपासून सुनावणी सुरू

EWS Reservation Supreme Court : सुप्रीम कोर्टात आजपासून आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे.

EWS Reservation Supreme Court : सुप्रीम कोर्टात आजपासून आर्थिक स्थितीच्या आधारावर आरक्षण (EWS Reservation) प्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे. मुख्य न्यायमुर्ती उदय लळीत यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. साधारण 30 याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. आजपासून पाच दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. या सुनावणीत राज्यांनादेखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. 

आर्थिक दुर्बल गट अर्थात EWSसाठी शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि नोकऱ्यांमधील 10 टक्के आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिकणार आहे. वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकासांबधींचा कायदा मंजूर केला होता. त्यानुसार, सरकारी नोकरीत आरक्षण आणि शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के देखील आरक्षण देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात जवळपास 30 याचिका दाखल झाल्या आहेत. दाखल करण्यात याचिकांमध्ये आरक्षणाबाबत 50 टक्क्यांच्या मर्यादेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संविधानातील अनुच्छेद 102 मधील नवीन सुधारणांना या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. 

सुप्रीम कोर्टातील सुनावणीत हा मुद्दा महत्त्वाचा

103 व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांना आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणासह विशेष तरतुदी करण्याची परवानगी देऊन संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भंग करणारी म्हणता येईल का? हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. 103 व्या घटनादुरुस्तीने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जमाती शिवाय आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. त्यासाठी घटनेत कलम 15(6) आणि 16(6) समाविष्ट केले. या दुरुस्तीने राज्य सरकारांना आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्याचा अधिकार देण्यात आला.

सुनावणीकडे देशाचे लक्ष

या प्रकरणातील निर्णयामुळे देशातील सामाजिक, राजकीय घडामोडींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आरक्षणाची तरतूद आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण लागू झाल्यास संविधानातील या तत्वाला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या EWSआरक्षणानुसार,  5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे किंवा 900 चैरस फुटांपेक्षा कमी घर आहे तसेच पाच लाखांपेक्षा कमी वार्षीत उत्पन्न आहे अशा नागरिकांना या आरक्षणात पात्र ठरवले जाणार होते. ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या दोन्ही वर्गांसाठी एकच उत्पन्न मर्यादा कशी असू शकते याबाबत काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सवाल उपस्थित केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, वादळी शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget