एक्स्प्लोर

Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?

Indian Navy : भारतीय नौदलात आज आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी दाखल झाली. यामुळं भारताच्या नौदलाच्या सामर्थ्याला बुस्टर मिळाला आहे.

मुंबई : भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि  आयएनएस वाघशीर या पाणबुडीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आलं आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजानाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय नौदलासाठी आजचा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवावा असा आहे. एकाच दिवशी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे. आज देशाला  दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीची वैशिष्ट्ये काय आहेत काय आहे हे जाणून घेऊयात. 

आयएनएस निलगिरी

भारतीय नौदलातील अधिकारी राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली.  निलगिरी फ्रिगेटवर दुश्मनांशी लढण्यासाठी वेपन्स आणि मिसाईल्स आहेत.यामध्ये प्रामुख्याने आठ ब्रह्मोस मिसाईल आहेत, त्या समुद्रावर मारा करतील. निलगिरीवर 32 बराक मिसाईल असून त्या आकाशातील टारगेटवर मारा करतील. यावर पाणबुडी विरोधी  रॉकेट लॉन्चर असून ते पाण्यातून मारा करतील. आयएनएस निलगिरी 5500 नॉटिकलं प्रवास करू शकते, स्पीड 28 नॉटिकल प्रति तास आहे. 

नौदलाचे दुसरे अधिकारी प्रताप पवार यांनी देखील आयएनएस निलगिरीसंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले या युद्धनौकेचं वजन 6670 टन असून लांबी 149 मीटर आहे. यामध्ये स्टेल्थ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. दुश्मनांच्या  रडार मध्ये टिपली जाऊ नये यासाठी अनेक उपकरण हे  समोरील डेक वर न ठेवता आत मध्ये घेण्यात आले आहेत, असं प्रताप पवार यांनी सांगितलं.  

INS सूरत युद्धनौका 

INS विशाखापटनम, INS मोरम्युगाव आणि INS इंफाळ नंतर प्रोजेक्ट 15B ची शेवटची युद्धनौका INS सूरत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गुजरात राज्याच्या एका शहराचं नाव पहिल्यांदाच युद्धनौकेला  केला देण्यात आलं आहे. INS सूरत या युद्धनौकेने निर्मितीपासून ते लाँच आणि लाँच ते कमिशनिंग पर्यंत  जो कालावधी लागला त्यामध्ये एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी वेळात हा सगळा प्रवास पूर्ण करत 31 महिन्यात जलावतरण ते कमिशनिंगचा काळ पूर्ण करत ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेची खासियत म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर तर केला आहे शिवाय पहिल्यांदाच निर्मिती वेळीच महिलांसाठी राहण्याची वेगळी सुविधा आहे. नौदल अधिकाऱ्यांची आणि सेलरची वाढती संख्या पाहता करण्यात आली आहे, अशी माहिती आस्था कंबोज आणि अहिल्या अरविंद या महिला नौदल अधिकाऱ्यांनी दिली. आयएनएस सूरत युद्धनौकेची लांबी 164 मीटर असून रुंदी 18 मीटर तर वजन 7600 टन आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी इथे सुद्धा ब्रह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुड्या  विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स आहेत.  

आयएनएस वाघशीर  

भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली  INS वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. 2022 साली जलावतरण झाल्यानंतर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षानंतर ती भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर आहे. ही खोलवर समुद्रात जाऊ शकते आणि शत्रूशी दोन हात करू शकते. शिवाय 45 ते 50 दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करू शकते, अशी माहिती नौदल अधिकारी निमिष देशपांडे यांनी दिली. 

सागरें प्रचंड We Dare म्हणत INS सूरत, स्टेल्थ स्ट्रेन्थ  करेज म्हणत INS निलगिरी आणि विरता- वर्चस्व -विजीता: म्हणत INS वाघशीर ह्या  तिन्ही मोठ्या ताकदीच्या युद्धनकौका आणि पाणबुडीचं कमिशनिंग होऊन नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने कमिशनिंगचा हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे. कारण पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढी मोठी ताकद भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची मान जागतिक पातळीवर अभिमानाने अधिक उंचावली आहे.

इतर बातम्या :

Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौसेनेला नवं सामर्थ्य दिलं, नवं व्हिजन दिलं : नरेंद्र मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; फ्लॅट जप्तीनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; फ्लॅट जप्तीनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणारDhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; फ्लॅट जप्तीनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; फ्लॅट जप्तीनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं,  बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
Vinod Tawde : अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण; सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात तेजी, चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? मुंबईसह विविध शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरात पुन्हा वाढ, चांदीच्या दरात घसरण, मुंबईसह देशातील विविध शहरातील दर एका क्लिकवर
‘Succession’ Mansion Destroyed : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Video : 18 बेडरुम, 10 हजार कोटींचा सर्वात महागडा आलिशान महाल कॅलिफोर्निया जंगलात जळून खाक! व्हिडिओ पाहून अंगावर शहारे
Embed widget