एक्स्प्लोर
अनुदानित 2.71, तर विनाअनुदानित सिलेंडर 55 रुपयांनी महागलं
अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2.71 रुपयांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 55.50 रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या मूळ किंमतीतील कराच्या प्रभावामुळे अनुदानित सिलेंडर महागलं आहे. अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2.71 रुपयांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 55.50 रुपयांची वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. दिल्लीत अनुदानित सिलेंडरची वाढलेली किंमत 493.55 रुपये झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांमध्ये बदल करतात आणि या किंमती सरासरी बेंचमार्क किंमत आणि परदेशी व्यवहारांवर अवलंबून असतात. जीएसटीतील दरात बदल केल्यामुळे घरगुती विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचं आयओसीने म्हटलं आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढलेल्या किंमतीचा परिणाम विनाअनुदानित सिलेंडरच्या दरावर झाला आहे. थेट 55.50 रुपयांची यामध्ये वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात 48 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दोन महिन्यात विनाअनुदानित सिलेंडर जवळपास 100 रुपयांनी महागलं आहे. तर 31 मे रोजी अनुदानित सिलेंडरची किंमत 2.33 रुपयांनी वाढली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























