एक्स्प्लोर

फुलराणीची कमळाला साथ! बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

भारताची फुलराणी कमळाला साथ देणार असून बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवाल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली मुख्यालयात सायनाचा पक्षप्रवेश झाला आहे. भाजप प्रवेशानंतर सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारही करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सायनासोबत तिच्या बहिणीनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी अनेक खेळाडूंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तसेच निवडणूकही लढवली होती. कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी हरयाणा विधानसभा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निडवणुक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सायना नेहवालही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेली सायनाचा समावेश जगभरातील उत्कृष्ट बॅडमिंटनपटूंमध्ये केला जातो. सध्या सायना जगभरातील आठव्या क्रमांकावर आहे.

सायना नेहवालने अनेकदा आंतराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उज्जव केलं आहे. मोठ्या पडद्यावरही सायना नेहवालचा बायोपिक लवकरच झळकणार आहे. परिणीती चोप्रा या बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बॅडमिंटनमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे सायना नेहवालला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्डने गौरवण्यात आलं आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने देशासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं.

सायना नेहवाल 24 आंतराष्ट्रीय बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकल्या आहेत. 2015मध्ये सायना नेहवालला जगातील पहिल्या क्रमांकाच्या बॅडमिंटन खेळाडूचा मान मिळाला होता. सायना हरियाणातील राहणारी आहे. परंतु, लहानपणापासून ती हैदराबादमध्ये राहिली आहे. तसेच तिचं शिक्षण आणि बॅडमिंटन ट्रेनिंगही हैदराबाद येथेचं झालं होतं.

सायनाने काही दिवसांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं समर्थन केलं होतं. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायना नेहवाल भाजप प्रवेशानंतर दिल्ली विधानसभेसाठी प्रचारही करणार की नाही, याबाबत काही दिवसांनी माहिती देण्यात येईल.

संबंधित बातम्या :

U19 World Cup | ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक; कार्तिक त्यागी विजयाचा मानकरी

धोनीची जागा रिकामीच, टीम इंडियातले सहकारी म्हणतायत 'मिस यू माही!'

मुंबईच्या सरफराजचं रणजी करंडकात ऐतिहासिक त्रिशतक, यूपीवर निर्णायक आघाडी, तर महाराष्ट्राचा आसामवर सनसनाटी विजय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget