![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lakshdweep : लक्षद्वीपसाठी 'या' एअरलाईन्सची फ्लाईट होणार सुरु, पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Lakshdweep : भारत आणि मालदीवदरम्यान सुरु असलेल्या वादामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा धक्का बसलाय. त्यातच आता भारतीयांकडून पर्यटनासाठी लक्षद्वीपला पसंती दिली जातेय.
![Lakshdweep : लक्षद्वीपसाठी 'या' एअरलाईन्सची फ्लाईट होणार सुरु, पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय spicejet airlines announced flights to lakshadweep and ayodhya india Maldives conflict detail marathi news Lakshdweep : लक्षद्वीपसाठी 'या' एअरलाईन्सची फ्लाईट होणार सुरु, पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/11/cf6c4ffca5c53438d05d96c8effe6f9d1704996319383720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लक्षद्वीपचे (Lakshdweep) फोटो शेअर केल्यानंतर एकच मुद्दा चर्चेत आला. बायकोट मालदीव यामुळे भारतीयांनी यंदा त्यांच्या सुट्टीमध्ये लक्षद्वीपला पसंती देत मालदीवच्या डेस्टिनेशनवर थेट फुल्लीच मारली. त्यामुळे लक्षद्वीपसाठी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावलं अनेक कंपन्यांकडून उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटने लक्षद्वीपसाठी फ्लाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअरलाईन्सकडून घोषणा
पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल झाल्याने आणि त्यावर मालदीवच्या मंत्र्यांच्या कमेंट्सवरून सुरू झालेल्या वादामुळे भारत आणि मालदीवमध्ये कटुता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे लक्षद्वीपला पसंती दिली जातेय.
आता तिथे जाण्यासाठी विमानांची सुविधा आणखी चांगली होणार आहे. स्पाईसजेट लवकरच लक्षद्वीपसाठी विमानसेवा सुरु करणार आहे. एअरलाइन्सचे प्रमुख अजय सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली.
लक्षद्वीपमध्ये आणखी एक विमानतळ सुरु होणार
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटचे एमडी अजय सिंग यांनी बुधवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सांगितले की कंपनीकडे लक्षद्वीपला उड्डाणे सुरू करण्याचे विशेष अधिकार आहेत. त्यांनी सांगितले की या भारतीय पर्यटन स्थळासाठी आगत्ती बेटावर एकमेव एअरफील्ड आहे, पण इथेही सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत. सध्या विमानतळावरील उड्डाणे कोचीमार्गे जातात. भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लक्षद्वीपबाबतही मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत आता लक्षद्वीपमध्ये आणखी एक विमानतळ बांधण्याची तयारी सुरू आहे.
अयोध्येलाही करणार विमानसेवा सुरु
36 बेटांचा समूह असलेल्या लक्षद्वीपमध्ये बंगाराम, अगट्टी, कदमत, मिनिकॉय, कावरत्ती आणि सुहेली सारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. कदमत हे भारतातील सर्वात सुंदर डायव्ह सेंटर्सपैकी एक म्हणून उदयास आले आहे. आता टूर आणि ट्रॅव्हल कंपन्याही येथे आकर्षक ऑफर्स देत आहेत. दरम्यान, बजेट एअरलाइन स्पायजेटनेही केंद्रशासित प्रदेशात उड्डाणे सुरू करण्याची घोषणा करून मोठी बातमी दिली आहे. याशिवाय स्पाइसजेटचे एमडी अजय सिंह यांनीही लवकरच अयोध्येला विमानसेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली.
देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी स्पाइसजेटला निधी उभारण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची आणि मंडळाची मंजुरी मिळाली. स्पाइसजेट इक्विटी शेअर्स आणि वॉरंटद्वारे हा निधी उभारणार आहे. स्पाईसजेटने एजीएमनंतर स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. अजय सिंग यांनी एजीएममध्ये सांगितले की ते 2,250 कोटी रुपयांच्या निधीचा मोठा भाग एअरलाइनचा आणखी विकास करण्यासाठी वापरतील. स्पाइसजेटकडे सध्या 39 विमाने कार्यरत आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)