एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : मिनिमम बॅलन्ससाठी सामान्यांना दंड, उद्योजकांचं काय?

ज्या बँकांनी केवळ मिनिमम बॅलन्स ठेवला म्हणून तुमच्या खिशातून 11 हजार 500 कोटी काढून घेतले, त्याच 21 बँकांनी 2017-18 या एका वर्षात बड्या उद्योगपतींची तब्बल 1 लाख कोटीची कर्ज राईट ऑफ केली आहेत.

मुंबई : ‘व्हेअर देअर इज ए इकॉनॉमिक्स.. देअर इज ए पॉलिटिक्स..’ हे व्हाईस वर्साही खरं आहे. त्यामुळेच बँकांमध्ये सगळ्यांना समान वागणूक मिळत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला कर्ज हवं असेल तर शेकडो चकरा माराव्या लागतील. शंभर कागदपत्रं तपासली जातील. अगदी हीच प्रक्रिया असायला पाहिजे. जर हप्ता चुकला तर मग नोटीस, मग दंड आणि नंतर जप्ती होईल. ही सुद्धा आदर्श प्रक्रिया. पण ही तुमच्याआमच्या बाबतीतच, कारण ज्या बँकांनी केवळ मिनिमम बॅलन्स ठेवला म्हणून तुमच्या खिशातून 11 हजार 500 कोटी काढून घेतले, त्याच 21 बँकांनी 2017-18 या एका वर्षात बड्या उद्योगपतींची तब्बल 1 लाख कोटीची कर्ज राईट ऑफ केली आहेत. जी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 57 टक्के जास्त आहे. खुद्द अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. तांत्रिक भाषेत या कर्जांना बॅड लोन्स म्हणतात. ती जर बॅलन्स शीटमध्ये दिसत राहिली तर बँकेचा ताळेबंद बिघडत जातो. त्यामुळे ही कर्ज राईट ऑफ अर्थात शुद्ध मराठीत निर्लेखित केली जातात. यातल्या बहुतेक कर्जांची कधीच वसुली होत नाही. मात्र तरीही अर्थशास्त्र जाणणारे लोक तांत्रिकदृष्ट्या या कर्जांना बुडीत कर्ज म्हणत नाहीत. कारण त्याच्या वसुलीसाठी बँका प्रयत्न करत असतात, ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे. बॅड लोन्सचा सर्वाधिक फटका कोणाला? आयडीबीआय बँकेने राईट्स ऑफ केलेल्या लोनमध्ये 336 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि हा आकडा 12 हजार 515 कोटीवर पोहोचला आहे. इंडियन बँकेने 1606 कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ केली आहेत. तर देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने 39 हजार 151 कोटीची कर्ज राईट ऑफ केली आहेत. आता या कर्जांवरचं व्याज तर मिळणार नाहीच. पण किमान मुद्दल वसुली व्हावी यासाठी प्रयत्न सुरु राहतील. पण त्याला कधीही 10-20 टक्क्यांपलीकडे यश मिळाल्याचं दिसत नाही. मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने दंड अगदी गेल्याच आठवड्यात देशातील 24 बँकांनी केवळ मिनिमम म्हणजे किमान बॅलन्स खात्यात ठेवला नाही, म्हणून खातेदारांकडून दंडाच्या स्वरुपात 11 हजार 500 कोटी रुपये वसूल केले. आता बँकांचा एकूण कारभार पाहता, हा दात टोकरुन पोट भरण्याचा प्रकार आहे आणि प्रामाणिक ग्राहकांशी प्रतारणा. जॉर्ज ऑरवेलने म्हटलं होतं, ऑल अॅनिमल्स आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल.. तर अशा मोठ्या लोकांसाठी नियम, कायदे वाकवले जातात. त्यांना कर्ज देण्यासाठी बँका रेड कार्पेट टाकतात. त्यांच्याविषयी असूया असण्याचं काहीच कारण नाही. मात्र याच बँकांनी जरा आपल्या प्रामाणिक आणि साध्या खातेदारांनाही जरा बरी वागणूक द्यावी ही अपेक्षा काही चुकीची नसावी.

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget