एक्स्प्लोर

GSTनंतर नफेखोरीला चाप लावण्यासाठी सरकारकडून खास उपाययोजना

जीएसटी लागू झाल्यानंतर नफेखोरीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं वरिष्ठ अधिकारी बद्री नारायण शर्मा यांची नॅशनल अॅण्टी-प्रॉफिटयरिंग अथॉरिटीच्या (एनएए) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जीएसटी लागू झाल्यानंतर नफेखोरीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं वरिष्ठ अधिकारी बद्री नारायण शर्मा यांची नॅशनल अॅण्टी-प्रॉफिटयरिंग अथॉरिटीच्या (एनएए) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना न देणाऱ्या व्यावसायिकांविरोधात काय कारवाई केली जावी हे ही समिती ठरवणार आहे. अशा व्यावसायिकांना दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा त्यांचं जीएसटी रजिस्ट्रेशनही रद्द केलं जाऊ शकतं. मागच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनएएच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली होती. नफेखोरीला चाप लावण्यासाठी या संस्थेसोबतच प्रत्येक राज्यात एक स्क्रीनिंग कमिटी, केंद्रीय स्तरावरील स्थायी समिती आणि सेंट्रल बोर्ड ऑफ एक्ससाइज अॅण्ड यांचा समावेश असणार आहे.  नफेखोरीला चाप कसा लावणार? जर एखाद्या ग्राहकाला वाटत असेल की, जीएसटीमुळे दर कमी झाले आहेत पण त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही तर तो ग्राहक संबंधित राज्याच्या स्क्रीनिंग कमेटीकडे आपली तक्रार नोंदवू शकतील. दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर जर नफेखोरीची शंका आल्यास निवेदन थेट केंद्रीय स्थायी समितीकडे पाठवता येईल. प्राथमिक स्तरावर आरोप योग्य वाटल्यास त्या प्रकरणाची सीबीईसी डायरेक्ट जनरलकडून चौकशी केली जाईल आणि या चौकशीनंतर ते आपला अहवाल सरळ एनएएला सोपावतील. जर एनएएनं मान्य केलं की, एखाद्या कंपनीनं नफेखोरी केली तर संबंधित कंपनीला नफ्यासह त्याचं व्याजही ग्राहकाला परत करावं लागेल. जर ग्राहकाला ते पैसे देणे कंपनीला शक्य नसेल तर त्यांना ते पैसे ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करावे लागतील. जर तक्रार फारच गंभीर असेल तर एनएए संबंधित व्यावसायिकाला दंडही ठोठावू शकते किंवा त्यांचं जीएसटी रजिस्ट्रेशनही रद्द होऊ शकतं. कशी होते नफेखोरी?   जीएसटी करव्यवस्थेत आधीच कर चुकवावा लागतो. कारण उद्योगपतींना जेवढा कर द्यायचा असतो तो आधीच कच्च्या मालावर देऊन त्यात घट करतात आणि उरलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करतात. यालाच इनपुट टॅक्स क्रेडीट म्हटलं जातं. यामुळे ग्राहकांवर बोझा पडत नाही. पण बऱ्याचदा ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदाच दिला जात नाही. याशिवाय जुन्या स्टॉकच्या माध्यमातून किंवा सॉफ्टवेअर अपडेट नसल्याचं कारण देऊन नफेखोरी केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget