VVIP राजकारण्यांच्या सुरक्षा दलात आता महिला CRPF कमांडोंचा समावेश : सूत्र
VVIP राजकारण्यांच्या सुरक्षा दलात आता महिला CRPF कमांडोंचा समावेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियांका गांधी वाड्रा त्या व्हीव्हीआयपी राजकारण्यांपैकी एक आहेत, ज्यांच्याकडे लवकरच महिला CRPF कमांडो असतील, त्यांच्या Z+ सुरक्षा दलात महिला कमांडो तैनात करण्यात आल्या आहेत. झेड प्लस सुरक्षा मिळवणाऱ्यांमध्ये केवळ महिलाच नव्हे, तर दिल्लीतील ज्येष्ठ नेते जसे गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचाही समावेश आहे. ज्यांना त्यांच्या उच्च जोखमीच्या कामकाजामुळे प्रगत सुरक्षा कनेक्टिव्हिटी प्रोटोकॉल प्रदान करण्यात येतो. त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांच्या तुकडीत जानेवारीपासून महिला सीआरपीएफ कमांडो असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआयपी सुरक्षेच्या सर्व बाबींचा समावेश असलेला अनिवार्य अभ्यासक्रम घेतलेल्या महिला कर्मचारीही नजिकच्या काळात विधानसभा निवडणुका होणार्या राज्यांमध्ये त्यांच्या प्रचार दौऱ्यावर त्यांच्यासोबत जाऊ शकतात. सीआरपीएफनं आपल्या व्हीआयपी सुरक्षा विंगमध्ये 32 महिला कमांडोंची पहिली तुकडी तयार केली आहे आणि त्यांनी निशस्त्र लढाई, एखाद्या व्यक्तीची झडती घेणं आणि विशेष शस्त्रे बाळगणं आणि गोळीबाराचे 10 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सुत्रांनी सांगितलं की, त्यांचा जानेवारीपासून व्हीव्हीआयपींच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्येच वास्तव्याला असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सुरुवातीला ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.
अंदाजे डझनभर इतर 'झेड-प्लस' सीआरपीएफ सुरक्षा कर्मचार्यांनाही महिला कमांडोकडून सुरक्षा पुरविली जाणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली. महिला कमांडो व्हीआयपींच्या घर-संरक्षण पथकापासून सुरुवात करतील आणि येत्या काही महिन्यांतच आगामी काळात ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या ठिकाणी तैनात केले जातील. महिला कमांडो, घराच्या सुरक्षेसाठी त्यांच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची झडती घेतील आणि व्हीव्हीआयपींच्या एकूण सुरक्षेच्या तपशीलात सहभागी असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :