कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर ओमायक्रॉनला कशी मात द्याल?, अदर पुनावालांनी भन्नाट पोस्ट करत दिली माहिती
Omicron : जगभरासह भारतातही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. यातच या भयानक व्हेरियंटशी दोन हात करण्याची एक भन्नाट आयडिया सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी मीमद्वारे शेअर केली आहे.
Omicron : मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोना महामारीने (Corona) धुमाकूळ घातला आहे. मागील काही महिन्यांत कोरोनाचं संकट कमी होतय असं वाटत होतं. पण तेव्हाच दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. आता या व्हेरियंटशी कसा सामना करायचा? याबाबत जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यातच कोरोनावरील कोव्हीशिल्ड ही लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी काय उपयोगी येईल? हे सांगताना एक भन्नाट मीम व्हिडीओ शेअर केला आहे.
पुनावाला यांनी शेअर केलेला व्हिडीओ हॉलीवुडची मूव्ही होम अलोन (Home Alone) यातील एक फनी सीन आहे. या सीनमध्ये एक छोटा मुलगा घरात एकटा अडकला असताना कशाप्रकारे दोन गुंडाना युक्तीने मात देत असतो अशाप्रकारचा सीन आहे. या सीनमध्ये गुंडाना डेल्टा आणि ओमायक्रॉन अशी नावं देऊन त्यांच्यावर मात करताना आधी डेल्टाला हरवण्यासाठी लस (Vaccine) आणि ओमायक्रॉनवर मात देण्यासाठी बूस्टर डोस (Booster) वापरु शकतो, असं प्रतित केलं आहे. त्यामुळे या मजेशीर पोस्टमधून पुनावाला यांनी ओमायक्रॉनला मात देण्यासाठी बूस्टर डोस उपयोगी पडू शकतो हेच सांगतिलं आहे. तर ही पोस्ट तुम्हीही पाहाच...
सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांसाठी लस आणणार
लहान मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनाची कोवाव्हॅक्स (Covavax) ही लस येणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी लस कोवाव्हॅक्स लाँच करेल, अशी माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पूनावाला यांनी दिली आहे. अदर पुनावाला यांनी सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये (Confederation of Indian Industry) बोलताना ही माहिती दिली. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी Covavax ची चाचणी सुरू आहे. Covavax ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे. अशी माहितीही पुनावाला यांनी दिली.
- Omicron in Maharashtra : अधिवेशनावर कोरोनाचं संकट, RTPCR टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह
- Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
- Omicron : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका, पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha