एक्स्प्लोर

Sonam Wangchuk : मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, परवानगीशिवाय कोणतेही इंजेक्शन देऊ नका; पत्नीची मागणी

Sonam Wangchuk Health Update : वांगचुक यांच्या पत्नीने रुग्णालय प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित केली असून प्रशासनाने अद्याप मेडिकल रिपोर्ट दिला नसल्याचा आरोप केला आहे. 

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं आहे. नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर जबरदस्तीने उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गितांजली अंगमो (Gitanjali Angmo)  यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना एक पत्र लिहून वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात यावं अशी मागणी केली आहे. सफदरजंग रुग्णालयाने वांगचुक यांचा मेडिकल रिपोर्ट दिला नसल्याने गितांजली यांनी प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलनस्थळावरुन उचलून अँब्यूलन्समधून थेट रुग्णालयात दाखल केलं. 

Gitanjali Angmo Demand : वांगचुक यांच्या पत्नीची शंका

सोनम वांगचुक यांच्या पत्नीने, गितांजली अंगमो यांनी सफदरजंग रूग्णालय अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. परवानगीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतंही इन्ट्राव्हेनस इंजेक्शन देऊ नका अशी मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयातून अन्यत्र हलवण्याची मागणी गितांजली अंगमोंनी केली.

रुग्णालय प्रशासनाकडे वांगचुक यांच्या मेडिकल रिपोर्टची मागणी करूनही त्याची कॉपी दिली जात नसल्याचा आरोप गितांजली अंगमो यांनी केली आहे. तसेच वांगचुक यांच्या आंदोलनावेळी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही आता भेटू दिलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे. 

सफदरजंग रूग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही, असा आरोप गितांजली अंगमो यांनी केला आहे. त्यामुळे वांगचुक यांना तातडीने डिस्चार्ज द्या, त्यांना आम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जातो अशी मागणी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. 

Sonam Wangchuk Protest : वांगचुक यांचं आंदोलन मोडलं

सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या उपोषणाचा शनिवारी 21 वा दिवस होता. मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्ती आंदोलनस्थळावरुन उचलून अँब्यूलन्समधून थेट रुग्णालयात दाखल केलं. यामुळे जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ झाला होता.

दरम्यान, अभिजीत दिपके हे आंदोलनस्थळी नसताना पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरुन उचललं. सोनम वांगचुक यांना उपोषणातून उचलत असताना दुसरीकडे पोलिसांनी अभिजीत दिपकेंना नजरकैदेत ठेवल्याचा दावा दिपकेंनी केला होता. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिपकेंना सोडण्यात आलं. दरम्यान, आता आंदोलनस्थळी जात अभिजीत दिपकेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget