एक्स्प्लोर

सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या मोदींच्या भाजपचा सैनिकांच्या गावात पराभव

संपूर्ण भारतातील सर्वात जास्त सैनिक असणाऱ्या गावात नरेंद्र मोदींच्या राष्ट्रवादाची हवा चाललेली नाही. सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या मोदींच्या भारतीय जनता पक्षाचा सैनिकांच्या गावात पराभव झाला आहे.

लखनौ : संपूर्ण भारतातील सर्वात जास्त सैनिक असणाऱ्या गावात नरेंद्र मोदींच्या राष्ट्रवादाची हवा चाललेली नाही. सैनिकांच्या नावाने मतं मागणाऱ्या मोदींच्या भारतीय जनता पक्षाचा सैनिकांच्या गावात पराभव झाला आहे. देशाला सर्वात जास्त सैनिक देणाऱ्या गाजीपूरमधील गहमर या गावात 10 हजाराहून अधिक सैनिक आहेत. याच गाजीपूरमधील जनतेने भाजपला साफ नाकारले आहे. गाजीपूर लोकसभा मतदारसंघातील गहमर या गावची लोकसंख्या 1.50 लाख इतकी आहे. या गावात 10 हजारांहून अधिक तरुण देशसेवा करत आहेत. या गावात प्रत्येक घरातील एक तरुण सैन्यात आहे, तर असंख्य घरांमध्ये निवृत्त सैनिक आहेत. गाजीपूरमध्ये बहुजन समाज पार्टीच्या अफजाल अन्सारी यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचा पराभव केला आहे. सैनिकांच्या नावावर मतं मागून मोदींच्या भाजपने देशात बहुमत मिळवलं आहे. परंतु सैनिकांच्या कुटुंबीयांनी आणि निवृत्त सैनिकांनी भाजपला नाकारले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ट्विटरवर म्हणाले की, "आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. परंतु गाजीपूरमध्ये मनोज सिन्हांच्या पराभवामुळे खूप रिकामं वाटतंय. त्यांचा पराभव जिव्हारी लागला आहे." मनोज सिन्हा यांना निवडणुकीत 4 लाख 46 हजार 690 मितं मिळाली आहेत. तर अफजाल अन्सारी यांना 5 लाख 66 हजार 82 मतं मिळाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशवाद्यांच्या अड्ड्यावर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. याचे देशपातळीवर मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात आले. अनेक सभांमध्ये मोदींनी सैनिकांच्या, शहीद सैनिकांच्या नावाने मतं मागितली. नागरिकांनी भाजपला भरभरुन मतदान केले. परिणामी भाजपला बहुमत मिळाले. परंतु गाजीपूरमधील सैनिकांच्या कुटुबीयांनी मात्र भाजपला साफ नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनातNarhari Zirwal Adiwasi MLA Protest : मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार, झिरवाळ आक्रमकAdivasi MLA Protest Mantralaya : नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक, थेट जाळीवर उड्याKiran Lahamate On Aadiwasi MLa Protest : आम्ही रडणारे नाहीत लढणारे, सरकारने विचार करावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
Embed widget