एक्स्प्लोर

चेन स्मोकर्सचं सिगरेटमुळे एक कोटी रुपयांचं नुकसान

मुंबई : सिगरेटच्या पाकिटावरील वैधानिक इशारा वाचूनही जर तुम्ही सिगरेट सोडण्याच्या विचारात नसाल, तर तुम्हाला खडबडून जागं करणारी एक माहिती आहे. सिगरेटमुळे तुमच्या खिशाला अक्षरशः भगदाड पडत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका सर्वेक्षणानुसार चेन स्मोकर्सना थोडंथोडक्या नव्हे एक कोटींचा फटका बसतो.   31 मे रोजी 'जागतिक तंबाखू विरोधी दिवसा'च्या निमित्ताने ही माहिती जाहीर करण्यात येत आहे. जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि दिवसाला 5 सिगरेट ओढत असाल, तर तुम्ही वयाची साठी गाठेपर्यंत तुमचं एक कोटी रुपयांचं नुकसान झालेलं असतं. सिगरेटची किंमत सरासरी 10 ते 15 रुपये असते.   प्रत्येक सिगरेटचे 12 रुपये धरले आणि दिवसाला पाच सिगरेटचं सेवन केल्याचं मानलं, तर दिवसाला तुम्ही 60 रुपयांचा धूर उडवता. म्हणजेच महिन्याला 1800 रुपयांचं नुकसान होतं. सिगरेटची किंमत स्थिर नसून गेल्या 4 वर्षांत दरवर्षी सिगरेटच्या दरात 20 टक्क्यांची वाढ होते. तंबाखूजन्य पदार्थांवरील कर याच वेगाने वाढत राहतील. त्यामुळे सिगरेटच्या किमतीत वार्षिक 8 टक्क्यांची वाढ धरली आहे. याप्रमाणे 30 वर्षांच्या कालावधीत (तिशी ते साठी) तुम्ही 24.47 लाख रुपये सिगरेटवर खर्च केलेले असतात.   यातील महत्त्वाचा भाग असा की, हे 24.47 लाख रुपये सिगरेटवर खर्च न करता गुंतवले असते (बँक किंवा अन्य ठिकाणी) तर 9 टक्के व्याजाच्या हिशोबाने 30 वर्षांत 69.23 लाख रुपये मिळाले असते.   धूम्रपानाचे तोटे सांगण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञाची आवश्यकता नसते. ब्राँकायटिस, अस्थमा, फुफ्फुसांचे आजार ते हृदयविकार आणि कर्करोग असे अनेक त्रास उद्भवू शकतात. महिन्याला 400 रुपये डॉक्टरांची फी धरली आणि वैद्यकीय उपचार, औषधं इत्यादी मध्ये वार्षिक 12 टक्के वाढ मानली तर 30 वर्षांमध्ये 11.59 लाख रुपये खर्च होतात. मात्र डॉक्टरांवर हा खर्च केला नसता आणि ती रक्कम गुंतवली असती तर 9 टक्के व्याजाच्या हिशोबाने 30 वर्षांत 26.70 लाख रुपये मिळाले असते.   दुसरीकडे हेल्थ इन्शुअरन्समध्ये पैसे गुंतवताना तुम्ही स्मोकर असल्याचं लपवणं निव्वळ अशक्य असतं. त्यामुळे नॉन-स्मोकर्सच्या तुलनेत गुंतवणुकीत तुम्ही 7.52 लाख रुपयांचं नुकसान करुन घेत असता.     सिगरेटमुळे तुमचं आयुष्य कमी होतं, असं म्हटलं जातं. एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता. म्हणजेच एक दिवस धूम्रपान केल्यावर तुमचं एका तासाचं आयुष्य कमी होतं. तर 24 वर्ष धूम्रपान करत राहिल्यास तुम्ही एक वाढदिवस कमी साजरा करता. त्यामुळे सिगरेट की एक कोटी रुपयांसह आरोग्यदायी आयुष्य, ही निवड तुम्हीच करायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget