Mathura Mosque Case : श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादावर आज न्यायालयात सुनावणी, काय येणार निकाल?
Shri Krishna Janmabhoomi : मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबत वाद सुरू आहे.
Mathura Mosque Case : श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri Krishna Janmabhoomi) शाही ईदगाह (Shahi Idgah) वादावर आज मथुरा (Mathura) जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबत वाद सुरू आहे.
याचिकेत इदगाह मशीद हटवण्याची मागणी
संपूर्ण जमीन ताब्यात घेऊन श्रीकृष्ण जन्मभूमीच्या बाजूला बांधलेली शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तर 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा कोर्टात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने वादग्रस्त जागेची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीची मागणीही केली होती. हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. सततच्या विलंबामुळे याचिकाकर्ते मनीष यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मनीषने उच्च न्यायालयातही हीच मागणी केली. यानंतर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून अहवाल मागवला. या प्रकरणी 29 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मंदिराच्या वतीने कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जावर चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
संपूर्ण वाद13.37 एकर जमिनीचा
12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. करारामध्ये 13.37 एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही सुरू ठेवण्याबाबत सांगितले आहे. संपूर्ण वाद या 13.37 एकर जमिनीचा आहे. या जमिनीपैकी 10.9 एकर जमीन श्री कृष्ण जन्मस्थानाजवळ आणि 2.5 एकर शाही इदगाह मशिदीजवळ आहे. या करारात मुस्लिम बाजूने मंदिरासाठी काही जागा सोडली आणि त्या बदल्यात मुस्लिम बाजूने जवळची काही जागा दिली. आता हिंदू बाजूने संपूर्ण 13.37 एकर जमीन ताब्यात घेण्याची मागणी केली जात आहे.
असे म्हणतात की, औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही इदगाह मशीद बांधली. 1770 मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठे यांच्यात युद्ध झाले. त्यात मराठे जिंकले. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना 13.37 एकर जमीन दिली. 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन अधिग्रहीत केली.
इतर महत्वाच्या बातम्या
सुप्रीम कोर्टात BCCI च्या याचिकेवर आज होणार सुनावणी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाशी संबंधित याचिका
Mumbai Rain Updates : मुंबईत पहाटेपासून पावसाची कोसळधार; सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात