एक्स्प्लोर
'रेल्वेच्या कार्यक्रमाचं वेळेत निमंत्रण मिळत नाही', सेना खासदार आक्रमक
मुंबई: मुंबईमध्ये आज शिवसेना आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या खासदारांना कार्यक्रमाला कायम डावललं जातं. असा आरोप करत सेना खासदारांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला.
वांद्रे स्टेशनवर आज वेगवेगळ्या स्टेशनवरील स्वंयचलित जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन झालं. मात्र, या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिवसेनचे खासदार व्यासपीठावर बसले नाहीत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
'मानपमानपेक्षा लोकांची कामं होणं महत्वाची आहेत.' असं म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सेनेलाही टोमणा लगावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement