मध्यप्रदेशात पुन्हा भाजप सरकार, शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
शिवराज सिंह यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून मध्यप्रदेशचा कारभार सांभळणार आहे. शिवाय आज त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याने शपथ घेतली नाही.
नवी दिल्ली : महिन्याभरापासून सुरू असलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर मध्यप्रदेशात भाजपचं सरकार स्थापन केलं .भाजपचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी एका छोट्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवराज सिंह यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून मध्यप्रदेशचा कारभार सांभळणार आहे. शिवाय आज त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याने शपथ घेतली नाही.
मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ट्वीट केले आणि सांगितले की, कोव्हिड -19 चा सामना करणे ही माझी प्राथमिकता आहे. शिवराजसिंह चौहान यांची सोमवारी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.
आप की शुभकामनाओं के लिए हृदय की गहराइयों से धन्यवाद।
मेरी सबसे पहली प्राथमिकता #COVIDー19 से मुक़ाबला है। बाक़ी सब बाद में... — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 23, 2020
मध्य प्रदेशातील भाजप आमदारांना आज सायंकाळी पक्षाच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांची पक्षाच्या नव्या नेत्याच्या रुपात निवड करण्यात आली. कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज सिंह चौहान प्रबळ दावेदार मानले जात होते.
Bhopal: BJP's Shivraj Singh Chouhan takes oath as the Chief Minister of #MadhyaPradesh, at Raj Bhavan. pic.twitter.com/nJuy5TCQR2
— ANI (@ANI) March 23, 2020
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.
Kamalnath Resigned | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा