(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवजयंतीला दिल्लीच्या JNUमध्ये पुन्हा गोंधळ, छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा डाव्या संघटनांवर आरोप
शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून वाद झाल्यची माहिती मिळत आहे.
Clash Erupts Between ABVP JNU Students : नवी दिल्ली : दिल्लीच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे JNU मध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून वाद झाल्यची माहिती मिळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा अभाविपचा आरोप केला आहे. त्यानंतर ABVP आणि JNU च्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Delhi | ABVP members in JNU alleged portrait of Shivaji Maharaj was vandalised (19.02)
— ANI (@ANI) February 19, 2023
On the occasion of Shivaji Jayanti, we kept a portrait at student activity centre, but students from SFI threw it outside the room while garland was thrown in the dustbin: JNU ABVP Secretary pic.twitter.com/kuY7i0Izbw
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे स्टुडंट अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. अॅक्टिव्हीटी सेंटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. परंतु, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी प्रतिमेचा अवमान केला. प्रतिमेला घातलेला हार देखील कचऱ्याच्या डब्ब्यात फेकण्यात आल्याची माहिती ABVP च्या महासचिवांनी दिली आहे.
तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी संघटनने (JNUSU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. JNUSU च्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ABVP च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हॉस्टेलवर हल्ला केला आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांच्या कॅंडल मार्चनंतर लगेच हा हल्ला करण्यात आल्याचे JNUSU च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना शांत केले आहे.
NSUIच्या महासचिवांनी म्हटले की, ABVP च्या विद्यार्थ्यांनी JNUSU च्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होते. JNUSU च्या कार्यालयात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी किंवा प्रतिमा ठेवण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता असते. असे असताना देखील ABVP कडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान असलेले सर्व फोटो हटवले. त्यामुळे ABVP आणि SFI च्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.
ABVP members kept Shivaji's portrait at JNUSU office for which permission from JNUSU delegation was needed. Despite that, they did it illegally. Other students came there & removed all portraits for screening programme due to which fight broke out b/w two groups:JNU NSUI Gen Secy pic.twitter.com/TXdJYSlTMH
— ANI (@ANI) February 19, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shiv Jayanti 2023 : दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे