एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2023 : यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Shiv Jayanti 2023 CM Eknath Shinde Speech : "दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल," अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आग्र्यातील लाल किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

Shiv Jayanti 2023 CM Eknath Shinde Speech : "दरवर्षी शिवजयंती (Shiv Jayanti) आग्रा किल्ल्यावरच (Agra Fort) साजरी करायची," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं. आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी शिवजयंती इथेच साजरी करणार असल्याचं म्हटलं. 

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याने सगळीकडेच उत्साहाचं वातावरण होतं. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने आग्र्यातील लाल किल्ल्यावर (Red Fort) शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी हजारो शिवप्रेमी जमले होते. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली होती. 

आग्रा किल्ल्यावरील जयंती सुवर्णाक्षरांत लिहिली जाईल : मुख्यमंत्री

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ज्या लाल किल्ल्यात औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करुन नजरकैदेत टाकले, ज्या दिवाण-ए-खास मध्ये शिवछत्रपतींना बोलावून त्यांचा अपमान केला, त्याच ठिकाणी शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होणे ही माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे. आज बदला घ्यायची संधी मिळाली. अनेक शिवभक्त या ठिकाणी आले आहेत. ही शिवजयंती सोनेरी अक्षरात लिहिली जाईल."  

दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपतींचे कार्य कोणालाही विसरता येणार नाही. गड-किल्ल्यांवर गेल्यावर कळतं काय मॅनेजमेन्ट होतं. छत्रपती शिवाजी महाराज ही एक दैवीशक्ती आहे. त्याकाळी काय परिस्थिती असेल हा विचार करुन आजही अंगावर काटा येतो. औरंगजेबाची फौज मोठी होती. म्हणून आपल्या गीतात म्हटलं आहे दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा." "देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात असून यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल," अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

VIDEO : CM Eknath Shinde Speech Agra : औरंगजेबाने शिवरायांचा अपमान केला होत, तिथेच आज शिवजयंती जन्मोत्सव

मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम करणार

दरम्यान आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी देणाऱ्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. या सोहळ्यानंतर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानने उत्तर प्रदेश सरकारला भेट म्हणून दिलेल्या शिवछत्रपतींचा 15 फुटी अश्वारुढ पुतळा उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांना सुपूर्द केला. यावेळी योगेंद्र उपाध्याय यांनी आग्र्यामधील मुघल म्युझियमचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असं करुन त्यात हा पुतळा लावण्याचे जाहीर केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रातSadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget