एक्स्प्लोर
बंगळुरुत तरुणीचा विनयभंग, घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद
बंगळुरु : बंगळुरुमध्ये नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर रस्त्यात मध्यरात्री दोन नराधम तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.
शहरातील कम्मनहळ्ळी भागात राहणारी ही तरुणी मध्यरात्री अडीच वाजता आपल्या घरी परतत होती. रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना, मागून आलेल्या दोन बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली.
सुमारे 30 सेकंदाच्या घृणास्पद प्रकारानंतर तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर नराधमांनी तिला ढकलून तिथून पळ काढला.
दरम्यान 31 तारखेच्याच रात्री कडेकोट बंदोबस्त असतानाही गर्दीमध्ये तरुणींचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन आधीच बंगळुरुतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. आता या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा बंगळुरुतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तापला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement