Army officer Odisha police station : मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
Army officer Odisha : पोलिसांनी पीडितेला गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली होती. 19 सप्टेंबरला हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर तरुणीने ही बाब उघड केली. 5 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Army officer Odisha police station : भुवनेश्वर येथे मेजरच्या होणाऱ्या पत्नीवर हल्ला आणि विनयभंगाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक झाल्यानंतर फक्त चार तासात जामीन मिळाला. सर्व आरोपी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. 20 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली. अतिरिक्त डीसीपी कृष्णा प्रसाद दास म्हणाले की, 11 मोबाइल फोन आणि आरोपींचे एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. 15 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास कार ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी मेजरसह त्यांच्या होणाऱ्या पत्नीशी गैरवर्तन आणि मारहाण केली होती. या दाम्पत्याने तक्रार देण्यासाठी भरतपूर पोलीस ठाणे गाठले. भरतपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी लष्कर अधिकाऱ्याला लॉकअपमध्ये डांबून त्याच्या होणाऱ्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मारहाण केल्याचा आरोपही पोलिसांवर आहे. पीडित तरुणी माजी ब्रिगेडियरची मुलगी आहे.
पोलिसांनी पीडितेला गैरवर्तनाच्या आरोपाखाली अटक केली होती. 19 सप्टेंबरला हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर तरुणीने ही बाब उघड केली. 5 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात तिच्यासह मेजरसोबत पोलिसांनी छळाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
मेजर बंगालमध्ये तैनात
मुलीने सांगितले की बंगालमध्ये पोस्टिंग असलेले मेजर ओडिशात आले होते. तरुणी भुवनेश्वरमध्ये रेस्टॉरंट चालवते. 15 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा रेस्टॉरंट बंद करून ती मेजरसोबत घरी परतत होती. यावेळी तरुणांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. मेजरने छेड काढणाऱ्यांच्या कृतीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी मिळून मेजरला मारहाण केली. मेजर आणि त्याची होणारी पत्नी तक्रार देण्यासाठी भरतपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही. मेजरसह तरुणीने प्रश्न उपस्थित केले असता पोलिसांनी अत्याचार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तरुणीला अटक केली.
पोलिसांनी मारहाण करून खोलीत कोंडले
पीडीत तरुणी म्हणाली की, 'महिला पोलिसांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. कॉरिडॉरमधून ओढून एका खोलीत नेले. येथे त्यांनी माझे हात-पाय बांधले आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा एका पोलिसाने माझा गळा दाबला तेव्हा मी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिचा हात चावला. त्यानंतर तो अधिकच चिडला आणि त्याने मला आणखी मारहाण केली.
पोलीस घाणेरडे बोलत होते
तरुणीने सांगितले की, 'काही वेळाने पुरुष पोलिस अधिकारी आला. त्यांनी माझे कपडे काढले. माझी ब्रा पण काढली. समोरून स्तनांना लाथ मारू लागला. मी वेदनेने ओरडत होतो म्हणून त्यांनी माझी पॅन्ट काढली. स्वत:च्या पँटची झिप उघडून लिंग बाहेर काढले, कुठे घेणार? किती वेळा घेणार? घ्यायला आवडेल की गप्प राहणार? मी मदतीसाठी जोरात ओरडत होते. तरुणीने सांगितले की, यावेळी पोलिसाने खूप अश्लील गोष्टी बोलल्या.
इतर महत्वाच्या बातम्या