एक्स्प्लोर
30 बलात्कार, 15 हत्या, सायको शंकरचा तुरुंगात मृत्यू
सायको शंकर या नावाने प्रसिद्ध असलेला सिरीअल किलर आणि बलात्कारी एम जयशंकर याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
बंगळुरु : सायको शंकर या नावाने प्रसिद्ध असलेला सिरीअल किलर आणि बलात्कारी एम जयशंकर तुरुंगात मृतावस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. बंगळुरुजवळ परप्पन्ना अग्रहारा तुरुंगात तो शिक्षा भोगत होता.
जयशंकरने जेवणाची थाळी चोरली आणि जमिनीवर घासून टोकदार केली. त्यानंतर त्या थाळीने गळा कापून घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
बीट ऑफिसर्सनी जयशंकरला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. त्याला तातडीने व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र दाखल करण्यापूर्वीच जयशंकरला मृत घोषित करण्यात आलं होतं.
जयशंकरने सप्टेंबर 2013 मध्ये तुरुंगाची 30 फूट उंच भिती ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, आणि पर्यायाने तो एकाच ठिकाणी स्थानबद्ध झाला. आपल्या दुर्बलतेमुळे त्याला नैराश्य आलं होतं.
तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जयशंकरने 30 बलात्कार आणि 15 हत्या केल्या होत्या. बलात्काराच्या तीन गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला सायको शंकर असं नाव देण्यात आलं. त्याच्या कथेवरुन 'सायको शंकर' नावाचा कन्नड चित्रपटही आला.
34 वर्षीय जयशंकर मूळ कर्नाटकचा होता. त्याचं बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं, त्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement