एक्स्प्लोर
वादग्रस्त स्वामी ओम यांना दहा लाखांचा दंड
सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना, सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
नवी दिल्ली: सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना, सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
देशाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला आहे. ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता.
मात्र कोर्टाने स्वामी ओम यांची याचिका तातडीने फेटाळून लावलीच, शिवाय सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या या याचिकेबद्दल, 10 लाखांचा दंड ठोठावला.
काही दिवसांपूर्वीच स्वामी ओम यांना सायकल चोरीप्रकरणाच्या जुन्या खटल्यात अटकही झाली होती.
दरम्यान, स्वामी ओम यांनी आपल्याकडे एकही रुपया नाही, त्यामुळे मी दंड भरु शकत नाही, असं म्हटलं.
त्यावर, तुमच्याकडे 34 कोटी अनुयायी असल्याचा दावा करता, मग त्यांच्याकडून एक-एक रुपये जरी घेतला, तरी दंड भरु शकाल, असं कोर्टाने सुनावलं.
कोण आहेत स्वामी ओम?
एका टीव्ही चॅनेलच्या लाईव्ह शोदरम्यान, महिलेला मारहाण केल्याने स्वामी ओम हे नाव चर्चेत आलं होतं. लाईव्ह शोमध्ये स्वामी ओम यांनी थेट महिलेला मारहाण केली होती.
यानंतर स्वामी ओम यांना 'बिग बॉस' या शोमध्येही आमंत्रित केलं होतं. तिथेही ते आपल्या टिपण्यांमुळे नेहमीच वादात होते.
संबंधित बातम्या
सायकल चोरीप्रकरणी स्वामी ओम यांना अटक
स्वामी ओम बाबांना दिल्लीत बेदम मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement