एक्स्प्लोर
Advertisement
स्टेट बँकेचं 'ब्रँचलेस' पाऊल, लवकरच लॉन्च करणार डिजी बँकिंग
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियानं ब्रँचलेस बँकिगच्या दिशेनं पाऊल उचललं आहे. स्टेट बँक लवकरच आपली डिजी बँक सुरु करत आहे. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना बँकेच्या रांगेपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
एसबीआय आपल्या डिजी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत आहे. एसबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं एसबीआय डिजी बँक लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. पुढील 3 ते 6 महिन्यात एसबीआय डिजीबँक ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या एसबीआय ऑनलाईन एसबीआय आणि एसबीआय एनीव्हेअरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत आहे. त्यातच ओम्नी चॅनेलच्या माध्यमातून एसबीआय डिजीबँकिंग सुरु करणार आहे. ही सेवा नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. तसंच डिजीबँकिंगसोबत ऑनलाईन मेगास्टोअरही एसबीआयकडून लॉन्च होण्याची शक्यता आहे.
नोटांबदीनंतर ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बँकेच्या रांगामध्ये उभं राहावं लागलं आहे. त्यामुळे डिजीबँकमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे डिजी बँकिंग?
डिजीबँक ही एक पेपरलेस प्रणाली आहे
यात अपच्या माध्यमातून अकाऊंट सुरु करता आणि वापरता येतं.
अप हीच डिजीबँकिगमध्ये ब्रँचची भूमिका निभावते.
डिजी बँक अपच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवहार, इन्स्टंट डेबिट कार्ड, 24 तास ऑनलाईन असिस्टंस या सुविधांचा लाभ घेता येतो.
ई-केवायसीच्या माध्यमातून डिजी बँकेच्या ग्राहकांचं व्हेरिफिकेशन होतं.
आधार कार्ड तुम्हाला प्रमाणित करतं आणि बँकेकडून येणारी व्यक्ती बोटांच्या ठशांवरुन तुमची ओळख पटवते.
डिजी बँक एक प्रकारचं वॉलेट असतं. ज्यात सारे व्यवहार ऑनलाईन होतात.
डिजी बँक वापरण्यासाठी काही बँका ऑफर्सही देतात.
सध्या डीबीएस बँकेचं डिजी बँक अप डिजीटल ट्रान्झक्शनमध्ये आघाडीवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement