एक्स्प्लोर
Advertisement
बचत खात्यातील मिनिमम बॅलन्सबाबत SBI चा मोठा दिलासा!
खरंतर एसबीआयने सरासरी मासिक रक्कम न राखलेल्या ग्राहकांकडून केवळ 8 महिन्यांमध्ये 1,771 कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम वसूल केली होती. त्यामुळे बँकेवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती.
मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने बचत खात्यामधील सरासरी मासिक रक्कम न ठेवल्यास लागणाऱ्या दंडात मोठी कपात केली आहे. बँकेने दंडामध्ये 75 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही ग्राहकाला 15 रुपये आणि 10 रुपये जीएसटी यापेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही.
कोणाला किती दिलासा?
महानगर आणि शहरांमधील ग्राहकांना बचत खात्यात सरासरी मासिक रक्कम न राखल्यास दर महिन्याला 50 रुपयांचा दंड द्यावा लागत होता. पण आता शहरांमधील एसबीआयच्या ग्राहकांना आता 15 रुपये दंड द्यावा लागणार आहे. मात्र दंडाच्या रकमेसह 10 रुपये जीएसटीही द्यावा लागणार आहे.
अशाचप्रकारे उपनगरातील ग्राहकांसाठी प्रतिमहिना 40 रुपयांचा दंड द्यावा लागत असे. पण आता त्यात कपात होऊन 12 रुपये झाला आहे.
तर ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रतिमहिना 40 रुपयांचा दंड आकारला जात असे. त्यात कपात होऊन 10 रुपये झाला आहे.
म्हणजेच महानगर आणि शहरी ग्राहकांना एकूण 25 रुपये, उपनगरातील ग्राहकांना एकूण 22 रुपये आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 20 रुपयांचा दंड द्यावा लागेल. यामध्ये त्यांना अनुक्रमे 25, 18 आणि 20 रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
बचत खात्यामध्ये किती रक्कम ठेवणं आवश्यक?
जर तुमचं बचत खातं महानगरामधील एखाद्या शाखेत आहे तर तुम्हाला 3,000 रुपयांची सरासरी मासिक रक्कम ठेवावी लागणार आहे, जी सप्टेंबर 2017 पूर्वी 5,000 रुपये होती. आता शहरी भागातील शाखांच्या बचत खात्यांमध्येही 3,000 रुपयांचा अॅव्हरेज बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. तर उपनगर आणि ग्रामीण भागातील खात्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे 2,000 रुपये आणि 1,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
एसबीआयवर चहूबाजूंनी टीका
खरंतर एसबीआयने सरासरी मासिक रक्कम न राखलेल्या ग्राहकांकडून केवळ 8 महिन्यांमध्ये 1,771 कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम वसूल केली होती. त्यामुळे बँकेवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली होती. दंडामधून वसूल केलेली रक्कम जुलै ते सप्टेंबरमध्ये बँकेला झालेल्या 1,581.55 रुपयांच्या नफ्यापेक्षाही जास्त आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात झालेल्या 3,586 कोटी रुपयांच्या एकूण नफ्याच्या सुमारे अर्धी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement