शॉर्टस् घातल्याने SBI बँकेत प्रवेश नाकारला, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
शॉर्टस् घातल्याने एकाला SBI च्या शाखेला प्रवेश नाकारला. कोलकाता येथील ग्राहकाना ट्वीट केला आहे. हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई : 'ग्राहक देवो भवः' ही आपल्या देशाची संस्कृती आहे. परदेशात भारतीयांना त्यांच्या पेहरावरून प्रवेश नाकारल्याचे आपण ऐकले आहे. मात्र आता भारतामध्ये देखील अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना कोलकाता येथील बँकेत घडली आहे. थ्री फोर्थ घालून हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तीला बँकेत प्रवेश नाकारण्यात आला. कोलकाता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेत थ्री फोर्थ घालून आला म्हणून एसबीआय शाखेत प्रवेश नाकारल्याची ग्राहकाने तक्रार केली आहे. तसेच फुलपॅन्ट घालून येण्याचा सल्ला दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे.
कोलकाता येथे राहणाऱ्या आशीषला त्याच्या पेहरावावरून बँकेत प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर आशिषने ट्वीट करत घडलेला प्रकराची SBI ला तक्रार केली आहे. आशिष ट्वीटमध्ये म्हणाला, "बँकेत प्रवेशासाठी ग्राहकाला ड्रेस कोड आहे का?" आशिषच्या या ट्वीटला SBI ने देखील उत्तर दिले आहे. SBI ने म्हटले की, "बँकेत प्रवेशासाठी कोणताही ड्रेसकोड नाही." या बरोबर SBI ने आशीषने तक्रार देखील दाखल केली आहे.
16 नोव्हेंबरला केलेल्या ट्वीटमध्ये आशिष म्हणाला की, "SBI च्या शाखेत आज शॉर्टस घालत मी गेलो. मला शॉर्टस घातल्यामुळे बँकेत प्रवेश नाकारला आणि फुल पॅन्ट घालत येण्यास सांगितले. बँकेत ग्राहकांच्या प्रवेशासाठी ड्रेस कोड आहे का?" या ट्वीटला रिप्लाय देत SBI ने उत्तर दिले की, "SBI च्या कोणत्याही शाखेत प्रवेशासाठी कोणताही ड्रेस कोड नाही. ग्राहक त्यांना आवडेल ते कपडे घालून बँकेत येऊ शकतात."
Hey @TheOfficialSBI went to one of your branch today wearing shorts, was told that I need to come back wearing full pants as the branch expects customers to "maintain decency"
— Ashish (@ajzone008) November 16, 2021
Is there some sort of an official policy on what a customer can wear and cannot wear?
आशिषच्या ट्वीटनंतर अनेकांनी आशीषला SBI चे खाते बंद कऱण्याचा सल्ला दिला. आशिषने म्हणाला की, "मााझे 7 वर्षापूर्वीचे जुने खाते बंद करण्यासाठी बँकेत गेलो होतो. माझे डेबिट कार्ड गहाळ झाल्याने हे खाते वापरले नाही. माझ्या नव्या डेबिट कार्डसाठी मी आता दिल्लीच्या शाखेत जाणार आहे."
बँकेत येणारा ग्राहक कोणते कपडे घालतो, त्याची जात-धर्म-पंथ कोणता आहे, हे ठरविण्याचा आणि ग्राहकाला प्रवेश नाकारण्याचा अधिकार बँकेच्या व्यवस्थापनाला कुणी दिला? पेहरावावरून ग्राहकास प्रवेश नाकारणे ही अतिशय शरमेची बाब आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
साडी नेसल्यामुळं रेस्टॉरंटनं महिलेला प्रवेश नाकारला, लेखिकेनं ट्वीट केलेला व्हिडीओ चर्चेत